जेलमध्ये दरवर्षी ₹ 40 लाख खर्च, महागडे कपडे-बूट घालतो लॉरेन्स बिश्नोई....

जेलमध्ये दरवर्षी ₹ 40 लाख खर्च, महागडे कपडे-बूट घालतो लॉरेन्स बिश्नोई....

belgavkar.com | belgaum | belgavkar

बिश्नोई समाजात काळवीटाचा खूप आदर

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा देशात चर्चेत आलं आहे. आता लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाने मोठा खुलासा केला आहे की, तो जेलमध्ये असताना त्याचं कुटुंब दरवर्षी त्याच्यावर तब्बल 35 ते 40 लाख रुपये करतं. रिपोर्टनुसार, 50 वर्षीय रमेश बिश्नोई यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच भविष्यात लॉरेन्स गुन्हेगार होईल असं कुटुंबीयांना कधीच वाटलं नव्हतं असंही म्हटलं.
रिपोर्टनुसार, लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई यांनी सांगितलं की, 'आम्ही नेहमीच श्रीमंत होतो. लॉरेन्सचे वडील हरियाणा पोलीसमध्ये कॉन्स्टेबल होते आणि त्यांची गावात तब्बल 110 एकर जमीन आहे. लॉरेन्स नेहमीच महागडे कपडे आणि बूट घालतो. त्यामुळे आताही कुटुंबीय तो जेलमध्ये असताना त्याच्यावर वर्षाला 35 ते 40 लाख रुपये खर्च करतात.'
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असून, सलमान खानशी जवळीक असल्याने ही हत्या केल्याचा दावा केला आहे. मात्र, या हत्येत लॉरेन्स बिश्नोई गँगचा खरच सहभाग आहे का?, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये सिद्दिकी यांच्या मुलाचा फोटो सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मास्टरमाईंडने झिशान सिद्दिकी यांचा फोटो शूटर्ससोबत स्नॅपचॅटद्वारे शेअर केला होता. शूटर्स आणि हत्येचा कट रचणाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी या एप्लिकेशनचा वापर केला होता.  
लॉरेन्स बिश्नोईचा जन्म पंजाबमधील फिरोजपूरमध्ये झाला. त्याचे खरे नाव बलकरन बरार होते. शाळेत असताना त्याने आपले नाव बदलून लॉरेन्स केले. त्याची काकू त्याला सांगत होती, तुझ्यावर लॉरेन्स नाव अधिक चांगले वाटते. त्यामुळे त्याने लॉरेन्स बिश्नोई नाव घेतले. आता हे नाव हायप्रोफाईल खटल्यामध्ये जोडले गेले आहे.

कॅनडाच्या पोलिसांनाही लॉरेन्स बिश्नोई हवा आहे. त्या ठिकाणी सुरु असलेल्या कारवायांमध्ये लॉरेन्स टोळीचा संबंध असल्याचा दावा कॅनडाचा आहे. मात्र, भारत सरकारने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यापूर्वी मे 2022 मध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नावही समोर आले होते. बिश्नोई टोळीने मूसवाला यांची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या तो गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती कारागृहात आहे. गुजरात एटीएस आणि राष्ट्रीय तपास संस्था त्याची चौकशी करत आहे.
लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती कारागृहात असून बाबा सिद्दिकी मर्डर प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचाही या गुन्ह्यामागे हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी 2022 मध्ये पंजाबच्या मानसा गावात पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या, 2023 मध्ये कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोपही आहे. लॉरेन्सच्या हिटलिस्टमध्ये काही मोठ्या नावांचा समावेश आहे, ज्यामध्ये सलमान खान पहिल्या क्रमांकावर मानला जातो. काळवीट शिकार प्रकरणात खानच्या सहभागानंतर हा वाद सुरू झाला. बिश्नोई समाजात काळवीटाचा खूप आदर केला जातो. बिश्नोईने त्याचा सहकारी संपत नेहराला सलमानवर पाळत ठेवण्यासाठी पाठवले होते, मात्र नेहराला हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली. एप्रिल 2024 मध्ये गोळीबाराचा प्रयत्नही घटनास्थळी पोलिसांच्या येण्यामुळे अयशस्वी झाला.

Lawrence Bishnoi cousin claims family spends up to 40 lakh per year for gangster shoes cloths

Lawrence Bishnoi

Lawrence Bishnoi gangster

जेलमध्ये दरवर्षी ₹ 40 लाख खर्च, महागडे कपडे-बूट घालतो लॉरेन्स बिश्नोई....
बिश्नोई समाजात काळवीटाचा खूप आदर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm