बेळगाव : पत्नीसह 3 जणांना अटक

बेळगाव : पत्नीसह 3 जणांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

व्यावसायिक पद्मण्णवर खूनप्रकरण

बेळगाव—belgavkar—belgaum : व्यावसायिक संतोष दुंडाप्पा पद्मण्णवर यांच्या खूनप्रकरणी गुरुवारी तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये पद्मण्णवर यांची पत्नी उमा संतोष पद्मण्णवर (वय 41, रा. अंजनेयनगर), तिचा फेसबुक फ्रेन्ड शोभराज एस. एन. ऊर्फ शोबीतगौडा (वय 36, बिदनूर, जि. कोडगू) व त्याचा साथीदार पवन रामनकट्टी (वय 35, रा. सोमवार पेठ बिदनूर, जि. कोडगू) या संशयितांचा समावेश आहे. व्यावसायिक संतोष पद्मण्णवर याचा खुन झाल्याचे उघडकीस येताच गेल्या तीन दिवसांपासून माळमारुती पोलिसांकडून याचा पाठपुरावा सुरू आहे.
belgaum-two-arrested-in-murder-of-belagavi-moneylender-wife-under-suspicion-belgavkar-बेळगाव-belgaum-202410.jpeg | बेळगाव : पत्नीसह 3 जणांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर
आधी नैसर्गिक मृत्यू म्हणून दफन केलेला मृतदेह बुधवारी बाहेर काढून उत्तरीय तपासणी करण्यात आली. तत्पूर्वी मृताची मुलगी संजना हिच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पत्नीने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिल्याने तिच्यासह पाच जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. तिने स्वतः गुन्ह्याची कबुली देताना अन्य दोघांची मदत घेतल्याचेही पोलिसांसमोर कबूल केले. यामध्ये उपरोक्त शोबीतगौडा व जो अनोळखी तरुण होता तो पवन रामनकट्टी असल्याचे स्पष्ट झाले.
बंगळूरहून ताब्यात : संतोष याच्यावर 10 तारखेला अंत्यसंस्कार झाल्यानंतर शोबीतगौडा व पवन हे दोघेही त्यांच्या गावी निघून गेले होते. परंतु, आठ दिवसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते त्यांच्या गावातूनही फरारी झाले होते. ते बंगळूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी काढली. माळमारुती ठाण्याचे एक पथक मंगळवारीच बंगळूरला रवाना झाले होते. बुधवारी या दोघांना ताब्यात घेऊन गुरुवारी बेळगावात आणले. मृताची पत्नी उमा व या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी तिघांनीही आपले चेहरे झाकून घेतले होते.
तासाचे सीसीटीव्ही डिलिट, संशय बळावला : बंगळूरला अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी मृताची मुलगी संजना ही वडिलांचा मृत्यू झाल्याचे कळताच बेळगावला आली. अंत्यसंस्कार करून आल्यानंतर तिने घरात येऊन आईकडे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा हट्ट धरला. यावेळी आईने स्मशानभूमीतून आली आहेस आधी आंघोळ कर, असा सल्ला दिला. ती आंघोळीला गेल्यानंतर उमा पद्मण्णवर यांनी आपल्या 13 व 15 वर्षाच्या दोन मुलांना 9 ऑक्टोबर रोजी खून घडलेल्या रात्री 7 ते 8 या वेळेतील सीसीटीव्ही फुटेज डिलिट करण्याची सूचना केली, त्यानुसार त्यांनी ते डिलिट केले. आंघोळ करून संजना जेव्हा आली तेव्हा तिने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या तासाचे सीसीटीव्ही फुटेज नव्हते. आईला विचारले असता तिने डिलिट झाले असेल असे सांगितले खरे. परंतु, संजनाने भावांना विचारले तेव्हा त्यांनी निष्पापपणे आईने सांगितल्याने डिलिट केल्याचे सांगितले. त्यामुळे संजनाचा संशय बळावला. तिने शेजारच्या घरात जाऊन सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये या एक तासाच्या काळात दोघेजण आपल्या घरात शिरल्याचे दिसून आले. यानंतर संपूर्ण खून प्रकरण समोर आले.
दोघांचा प्रत्यक्ष सहभाग नाही : या खून प्रकरणात एकूण पाचजणांची नावे आहेत. उपरोक्त तिघांव्यतीरिक्त घरातील कामगार नंदा कुरीया व प्रकाश कुरीया यांचीही नावे एफआयआरमध्ये आहेत. परंतु, हे दोघे खून घडल्यानंतर घरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेचे ते दोघेच प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता कमी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
उशीने श्वास गुदमरून घेतला जीव : आंबिलीतून झोपेच्या गोळ्या दिल्या : उपलब्ध माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांपासून संतोष व पत्नी उमा यांच्यात वैयक्तिक कारणावरून वाद सुरू होता. फेसबुक फ्रेंड शोभित गौडाशी आपल्या पत्नीची मैत्री संतोषला खटकत होती, त्यामुळे या दोघांमधील वाद टिपेला पोहोचला होता. 9 ऑक्टोबर रोजी नाचण्याच्या आंबिलीतून झोपेच्या गोळ्या दिल्यामुळे संतोषला गाढ झोप लागली. पत्नीने प्रयत्न करूनही त्याचा जीव गेला नाही. शेवटी आपल्या फेसबुक फ्रेंडशी संपर्क साधून उमाने त्याला घरी बोलावून घेतले. त्यानंतर उशीने श्वास गुदमरून त्याचा जीव घेण्यात आल्याची माहिती उजेडात आली आहे.

Belgaum Two Arrested In Murder Of Belagavi Moneylender; Wife Under Suspicion belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum Girl files plaint against mom over dad’s suspicious death belgaum

बेळगाव : पत्नीसह 3 जणांना अटक
व्यावसायिक पद्मण्णवर खूनप्रकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm