बेळगाव—belgavkar—belgaum : @गणेशपूर : गणेशपूर येथे पार्किंगवरून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
गणेशपूर येथील प्रवीण प्रकाश पादके नामक एकजण गणेशपूर पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका बेकरीतून ब्रेड आणण्यासाठी गेले होते. यावेळी बेकरीशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पार्किंगच्या कारणावरून प्रविणसोबत हुज्जत घातली. तुम्ही आमच्या घरासमोर गाडी का लावली असा सवाल केला. यावेळी झालेल्या शाब्दीक बाचाबाचीत त्याने अचानक हातातील धारदार मुष्टीने आणि राॅडने हल्ला केला.
या हल्ल्यात प्रवीण यांच्या चेहरा आणि नाकावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बेळगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
