तिरंग्याचा अवमान? राष्ट्रध्वज हातात घेऊन त्यानं CM चे बूट काढले;

तिरंग्याचा अवमान?
राष्ट्रध्वज हातात घेऊन त्यानं CM चे बूट काढले;

belgavkar.com | belgaum | belgavkar

Video showing Congress worker taking off Siddaramaiah's shoes sparks row. व्हायरल व्हिडीओ नंतर होतेय टीका

Watch | Congress worker with Indian flag in hand removes Karnataka CM Siddaramaiah's shoes : ‘सतरंजी उचले’ कार्यकर्ते अशी उपमा राजकीय कार्यकर्त्यांना दिली जाते. नेत्यांची हुजरेगिरी करताना कार्यकर्ते कधी कधी भानही हरपून बसतात. अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या एका कार्यक्रमासाठी बंगळुरू येथे आले होते. यावेळी सिद्धरामय्या आपल्या पायातील बूट काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना बूट काढता येत नव्हते. यासाठी एक कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने स्वतःच्या हाताने त्यांचे बूट काढले. पण यावेळी कार्यकर्त्याच्या हाताता भारताचा राष्ट्रध्वज होता. ज्यामुळे आता काँग्रेसवर टीका होत आहे.
प्रकरण काय आहे? : गांधी जयंती असल्यामुळे सिद्धरामय्या हे बंगळुरू येथे पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमात महात्मा गांधी यांना मानवंदना देण्यात येणार होती. यासाठी सिद्धरामय्या पायातील बूट काढत होते. मात्र त्यांना बूट काढता येत नव्हते. यावेळी एक कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने सिद्धरामय्या यांना बूट काढण्यासाठी मदत केली.
भ्रष्टाचार प्रकरणामुळे सिद्धरामय्या अडचणीत z कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर भ्रष्टाचारासह अनेक गुन्हेगारी आरोपांवरील खटले दाखल झाले आहेत. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) भूखंड वाटप प्रकरणात सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, राजकीय कारणांसाठी भाजप मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेस नेतृत्वाने केला होता. या कारवाईनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “मी चौकशीला सामोरे जायला घाबरत नाही. कायद्याची लढाई लढण्यासाठी मी तयार आहे.”

Video showing Congress worker taking off Siddaramaiahs shoes sparks row

Watch | Congress worker with Indian flag in hand removes Karnataka CM Siddaramaiahs shoes

Watch : Congress worker unties Siddaramaiahs shoes as Karnataka CM steps on dais for Gandhi jayanti

Congress Worker With Indian Flag In Hand Removes Karnataka Cm Siddaramaiah Shoes Less

तिरंग्याचा अवमान? राष्ट्रध्वज हातात घेऊन त्यानं CM चे बूट काढले;
Video showing Congress worker taking off Siddaramaiah's shoes sparks row. व्हायरल व्हिडीओ नंतर होतेय टीका

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm