
बेळगाव—belgavkar—belgaum : हातात धारदार शस्त्र, छऱ्याची बंदूक घेऊन रील तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करणे तरूणांना चांगलेच महागात पडले आहे. हातात शस्त्रे घेऊन डॉन असल्याचे भासवत सोशल मीडियावर रील तयार करण्याचे प्रकार वाढले आहेत. असा प्रकार करणार्या बैलहोंगल तालुक्यातील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीने रील्स तयार करून सामाजिक शांततेचा भंग करू पाहणार्यांना जिल्हा पोलिस प्रमुखांनी कडक इशारा दिला आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
विविध अॅपवर रील्स तयार करून व्हायरल करण्याचे वेड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काहीजण हातात तलवार, चाकू, जांबीया यासह खेळण्यातील पिस्तूल अथवा अन्य शस्त्र घेऊन रील करण्याचे प्रकारही दिसून येत आहेत. एखाद्या चित्रपटातील संवाद बोलत अभिनेत्यासारखा अभिनय करण्याचा खटाटोप करत काहीजण स्वयंघोषित डॉन बनून शस्त्रधारी रील्स बनवत आहेत. हाती तलवार घेऊन रील्स बनवणार्या दोघा तरुणांवर बैलहोंगल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. जर कोणी अशा पद्धतीने शस्त्रे हाती घेऊन रील्स बनवत असेल व ही रील्स व्हायरल झालेली दिसल्यास पोलिसांकडून संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल, इतकेच नव्हे तर त्याची कारागृहात रवानगी केली जाईल.
बैलहोंगल तालुक्यातील मेकलमराडी येथील रहिवासी मुशरफघान याने हातात चाकू तलवार या घटनेचे केवळ चित्रीकरणच केले नाही तर ते सोशल मीडियावर पोस्टही केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या नेसरगी पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.
