बेळगाव शहरातील पथदीप एलईडी दिव्यांनी उजळणार

बेळगाव शहरातील पथदीप एलईडी दिव्यांनी उजळणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील सर्व पथदीप येत्या काही दिवसांत एलईडी दिव्यांनी उजळणार आहेत. स्मार्ट सिटीच्या (Smart City) एलईडी योजनेला ठेकेदार मिळाला आहे. शहरात सुमारे 33 हजार पथदीप असून, सध्या तेथे सोडियम वेपरचे दिवे लावलेले आहेत. आता ठेकेदार कंपनीला वर्कऑर्डर मिळताच कंपनीकडून सर्व जुने दिवे काढून तेथे एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून सर्वत्र एलईडी दिवे लावण्याची योजना आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले. ही योजना बीओटी तत्त्वावर असल्यामुळे प्रारंभी प्रतिसाद मिळाला नाही. ज्या कंपनीला हा ठेका मिळेल, त्या कंपनीला स्वखर्चातून एलईडी दिवे बसवावे लागणार आहेत.
एलईडीमुळे जी विजेची बचत होणार आहे, ती रक्कम ठेकेदार कंपनीला मिळणार आहे. त्यामुळे अनेकदा निविदा काढूनही कोणतीही कंपनी पुढे आली नव्हती, मात्र स्मार्ट सिटी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार आता या योजनेसाठी ठेकेदार कंपनी मिळाली आहे. स्मार्ट सिटी योजनेचा आराखडा तयार करताना त्यात पथदीपांवर एलईडी लावण्याचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यात दोन वर्षांपूर्वी शहरातील पथदीपांचे ऑडिट करण्यात आले. सध्या पथदीपांसाठी किती वीज लागते ? बिलापोटी किती रक्कम महापालिकेकडून हेस्कॉमला दिली जाते, याची माहिती घेण्यात आली.
त्यासाठी एक कंपनी नियुक्त केल्यानंतर त्या कंपनीने ऑडिट करून एलईडीमुळे जी विजेची बचत होणार आहे, ती रक्कम ठेकेदार कंपनीला मिळणार आहे. त्या कंपनीने ऑडिट करून अहवाल दिला. त्यानुसार एलईडी दिवे बसविल्यास 54 टक्के बचत होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे स्मार्ट सिटी विभागाने या योजनेचा आराखडा तयार केला. बीओटी तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे. शहरात तब्बल 33 हजार पथदीप आहेत. एलईडीमुळे जी बचत होईल, ती रक्कम ठेकेदार कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरातील पथदीप एलईडी दिव्यांनी उजळणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm