बेळगाव : छापा टाकून 13 जणांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हुन्नूर गावाच्या रस्त्याजवळ जुगार खेळत असताना छापा टाकून 13 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जावेद मुसाफिर यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी करगुप्पी गावातील 13 जणांना अटक केली आहे.
हुन्नूर गावाच्या रस्त्याजवळ काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी छापा टाकून 13 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये करगुप्पी गावातील लगमा जोरली, मनोज पुंडे, सत्याप्पा जोरली, रमेश नाईक, अजय पुजेरी, भीमप्पा गुटगुद्दी, मारुती जोरली, आनंद जडगी, मंजुनाथ म्याकळी, होळेप्पा मोण्णावर, लगमन्ना पुजेरी, प्रभू मग्गेण्णावर, सुरेश माळगी यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ₹ 23 हजार 200 रुपये जप्त केले आहेत. अटक केलेल्यांना न्यायालयासमोर हजर केल्याचे जावेद मुसाफिर यांनी सांगितले.

Belgaum 13 people were arrested in a raid while gambling near the road of Hunnoor village belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum 13 people were arrested in a raid while gambling near the road of Hunnoor village

13 people were arrested in a raid while gambling near the road of Hunnoor village belgaum

बेळगाव : छापा टाकून 13 जणांना अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm