बेळगाव : मूठभर कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन फलक काढले....

बेळगाव : मूठभर कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन फलक काढले....

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : गणेशोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षीही गणेशोत्सव साजरा करताना विविध ठिकाणी फलक लावण्यात आले. येथे मराठी भाषिक अधिक प्रमाणात असल्यामुळे आजपर्यंत मराठीतच हे फलक लावण्यात आले होते. मात्र त्याची पोटतिडीक मूठभर कन्नड कार्यकर्त्यांना निर्माण झाली. त्यामुळे मूठभर कन्नड कार्यकर्त्यांनी गुरुवारी महानगरपालिकेसमोर आंदोलन करुन यापुढे कन्नडमध्येच फलक लावावेत, अशी मागणी केली. त्याठिकाणी महानगरपालिकेच्या गणेशोत्सवाबाबत लावण्यात आलेल्या फलकावर कन्नडबरोबरच मराठीचा उल्लेख होता.
तो फलक काढण्यास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव घालण्यात आला. मात्र मराठीबरोबर कन्नड असलेला फलक फाडून कन्नड भाषेचाही स्वतः च अवमान केल्याचा प्रकार घडला आहे. केवळ मराठीला विरोध करायचा हाच या मागचा उद्देश होता. मात्र यामध्ये कन्नड भाषेचा अवमान कार्यकर्त्यांनी केला आहे.
गुरुवारी महानगरपालिकेसमोर काहीवेळ गोंधळ घालून वातावरण बिघडविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे अथणी, बैलहोंगल, रायबाग, कुडची, सौंदत्ती परिसरातून कार्यकर्ते आले होते. स्थानिक कार्यकर्ते कोणीच नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांतूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गणेशोत्सवाचा फलक फाडल्यामुळे संतापही व्यक्त करण्यात आला.

Belgaum handful of activists protested and removed the banner belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum protested and removed the banner

protested and removed the banner belgaum

बेळगाव : मूठभर कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन फलक काढले....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm