मनी लाँड्रिंगचे आरोप अन् बेकायदेशीर मालमत्ता, ED कडून अटक, तरीही तिकीट

मनी लाँड्रिंगचे आरोप अन् बेकायदेशीर मालमत्ता, ED कडून अटक, तरीही तिकीट

belgavkar.com | belgaum | belgavkar

खाणकामातून 400-500 कोटी रुपयांचा निधी

काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसने आपल्या 31 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने शुक्रवारीच पक्षात प्रवेश केलेल्या कुस्तीपटू विनेश फोगटला जिंदच्या जुलाना विधानसभेतून उमेदवारी दिली आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांना गढी सांपला किलोई विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर दुसरीकडे या यादीत एका अशा उमेदवाराचे नाव आहे, जो सध्या तरुंगात आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसने सोनीपतमधून सुरेंद्र पनवार यांना तिकीट दिले आहे. ते येथून विद्यमान आमदार आहेत. मात्र ते सध्या तुरुंगात आहे. त्यांना जुलै महिन्यात ईडीने अटक केली होती. बेकायदा खाणकामाशी संबंधित एका प्रकरणात ईडीने छापे टाकले होते. यानंतर कारवाई करत काँग्रेस आमदाराला अटक करण्यात आली.

सुरेंद्र पनवार हे हरियाणातील सोनीपत येथून काँग्रेसचे आमदार आहेत. 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोन वेळा भाजपच्या आमदार कविता जैन यांचा पराभव केला.
ईडीने जानेवारी महिन्यात सुरेंद्र पनवार यांच्या घराची झडती घेतली होती. यमुनानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ईडीच्या अंदाजानुसार, गेल्या काही वर्षांत अवैध खाणकामातून 400-500 कोटी रुपयांचा निधी निर्माण झाला आहे.
शुक्रवारी ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. आता पक्षाने कुस्तीपटू विनेश फोगटला हरियाणा विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे. दरम्यान हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

ED Haryana Congress MLA Surender Panwar in illegal mining

Haryana polls : Congress releases 1st list fields Vinesh Phogat from Julana

Sonipat Congress MLA Surender Panwar

मनी लाँड्रिंगचे आरोप अन् बेकायदेशीर मालमत्ता, ED कडून अटक, तरीही तिकीट
खाणकामातून 400-500 कोटी रुपयांचा निधी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm