ब्रह्मयोनी टेकडीवर सापडल्या वनौषधी

ब्रह्मयोनी टेकडीवर सापडल्या वनौषधी

belgavkar.com | belgaum | belgavkar

Researchers Discover Medicinal Plants at Brahmayoni Hill मधुमेह औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'गुरमार' ही

@ : बिहारमधील गया येथील ब्रह्मयोनी टेकडीवर औषधी वनस्पतीच्या विविध प्रजातींचा शोध लागला आहे. यात प्रामुख्याने गुरमार या वनस्पतीचा समावेश असून मधुमेहावरील औषधांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) वतीने गुरमार या वनस्पतीचा वापर मधुमेहावर देण्यात येणाऱ्या बीजीआर-43 या औषधात करण्यात येतो (Council of Scientific and Industrial Research (CSIR)).
‘गयेतील ब्रह्मयोनी टेकड्यांवरील पारंपरिक वनौषधींचे संशोधन’ अशा शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. येथे आढळणाऱ्या पारंपरिक वनौषधींचा नियमित वापर करण्यात येत असल्याने या नामशेष होऊ नयेत यासाठी स्थानिकांनी या वनस्पतीच्या वापराप्रमाणेच त्यांची विपुल प्रमाणात लागवडही करायला हवी असे आवाहन या अहवालात करण्यात आले आहे. ‘गुरमार’प्रमाणेच पिथेसेलोबियम डल्स आणि झिझिफस जुजबा या दोन औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आढळल्या असून त्यावर अद्याप संशोधन सुरू आहे.
दस्तऐवजीकरण होणार : शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागतील स्थानिकांकडून वापरण्यात येणाऱ्या वनौषधींवर संशोधन करणे आणि त्यांचे दस्तऐवजीकरण करणे या उद्देशाने हे संशोधन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या वनौषधींचे गुणधर्म समजावून घेण्यासाठीही हे संशोधन करण्यात आले.

array of medicinal plants at Brahmayoni Hill in Bihar's Gaya, with the most notable of them being Gurmar which is used for its anti-diabetic properties.

Scientists uncover medicinal plants atop hill in Gaya

Researchers Discover Medicinal Plants at Brahmayoni Hill

1 day ago

ब्रह्मयोनी टेकडीवर सापडल्या वनौषधी
Researchers Discover Medicinal Plants at Brahmayoni Hill मधुमेह औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'गुरमार' ही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm