बेळगाव शहरातील शास्त्रीनगर येथील 12 फुट अजगर साप सापडला VIDEO;

बेळगाव शहरातील शास्त्रीनगर येथील 12 फुट अजगर साप सापडला VIDEO;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शास्त्रीनगर येथे गुरुवारी (1 ऑक्टोबर) रात्री अजगर आढळला होता. मागील पाच दिवसांपासून शास्त्रीनगर येथे हिंडत करीत असलेला अजगर मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास रेल्वे स्टेशन ओल्ड गुडस शेड रोड रामभवनजवळ सापडला आहे. हा अजगर सुमारे 12 फूट असुन वजन 30 ते 40 किलो आहे. ओल्ड गुडशेड रोड वरून रेल्वे पटरीवर जाताना हा अजगर रेल्वे कर्मचारी पैनी रिशी व एमआर सिंग यांना 11.45 वाजता (6 ऑक्टोबर) दिसला. त्यांनी सर्पमिञ आणि समाजसेवक गणेश दड्डीकर यांना फोन करून याबाबत माहिती दिली. संयमीने हा अजगर अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर रेल्वे पटरीवर पकडण्यात आला आहे. त्यामुळे शास्ञीनगर भागात गणेश दड्डीकर यांचे कौतुक होत आहे.


यानंतर त्या अजगर सापाला आज दुपारी सर्पमिञ रामा पाटील, गणेश दड्डीकर व वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी जांबोटीच्या जंगलात सोडण्यात आले.

घटनाक्रम असा आहे : अजगर आढळला ते अजगर सापडला
त्यामुळे शास्त्रीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री 1 वाजेपर्यंत स्थानिक रहिवाशांनी व तरुणांनी एकत्र येवून अजगर पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश मिळाले नाही. या अजगराचा व्हिडीओ व त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शुक्रवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यात एकाने अजगराचे शेपूट पकडून ठेवल्याचे दिसते. या अजगराचे संपूर्ण चित्रणही त्या व्हिडीओत आहे. शास्त्रीनगर 9वा क्रॉस येथे एक खासगी मालकीची खुली जागा असून त्या जागेत झुडपे वाढली आहेत. तेथील एका मोठ्या खड्ड्यात पाणी साचले असून त्यातच हा अजगर आढळून आला.



तेथील नागरिकांनी रात्री सर्पमित्र व समाजसेवक गणेश दड्डीकर व राजू फडतरे यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी अजगर पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांनाही यश आले नाही. आता वन खात्याची मदत घेऊन अजगर पकडण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. दरम्यान, अजगर अद्यापही तेथेच असल्याने तेथील रहिवासी धास्तावले आहेत. खुल्या जागेपासून काही अंतरावर लेंडी नाल्याचे पात्र आहे. त्या लेंडी नाल्यातून अजगर आला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. शास्त्रीनगरसारख्या नागरी वसाहतीत अजगराचा वावर पाहून सर्पमित्रांनाही आश्चर्य वाटले आहे. अनेकदा घोणस साप अजगर असल्याचे समजून सर्पमित्रांना बोलावले जाते. त्यामुळे शास्त्रीनगर येथे आढळलेला घोणस असावा, असा अंदाजही व्यक्त झाला. परंतु, तो घोणस नसल्याचे श्री. दड्डीकर यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भात उपवन संरक्षण अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून वन खात्याचे अधिकारी शनिवारी सकाळी शास्त्रीनगर येथे येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडीओ पाहता तो अजगर असल्याचे स्पष्ट होते. 15 फुटापेक्षा जास्त लांबीचा तो दिसत असून त्याची जाडीही जास्त आहे. आज सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले असुन अजगर पकडणार आहेत. गणेश दड्डीकर, सुधीर किल्लेकर, सागर उचगावकर, सुनील गोडसे, विशाल मुरकुटे, विनायक हवलानाचे, संतोष साळवी, सुधीर साळवी, गुरू अनवेकर, विनायक बिर्जे, महंतेश कोमार, शिवराय कोमार व ईतर नागरीक जेसीबी व मोटर पंपच्या सहाय्याने त्या खुल्या भागातील साचलेला गाळ व पाणी काढत. गेल्या तीन दिवसांपासुन हे कार्य सुरु आहे. माञ अद्यापही त्या अजगरचा शोध लागलेला नाही. अजगर त्याच भागात आहे की राञीच्यावेळी त्या ठिकाणाहून स्थलांतर झाला...? याबाबत कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. माञ त्या भागातील नागरिकांमध्ये अद्यापही भिती पसरलेली आहे. गणेश दड्डीकर यांनी कार्पोरेशन ला विनंती करून जेसीबी अणि पाणी काढण्यासाठी मोटर माघून घेतली. सकाळी 7:30 पासून दुपारी 4 पर्यंत संपूर्ण पाणी खाली करून शोध मोहीम चालू आहे. स्थानिक नागरिकांनीही एक वॉटर पंप मदतीसाठी आणला होता. सतत 3 दिवस ही शोध मोहीम चालू आहे. स्थानिक नागरीकांनीही शोधकार्यात मदत केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरातील शास्त्रीनगर येथील 12 फुट अजगर साप सापडला VIDEO;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm