बेळगाव : विद्यार्थिनीचा मृत्यू

बेळगाव : विद्यार्थिनीचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : पावसासोबत कीटकजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिसून आले आहे. एडीस इजिप्ती या डासांच्या चाव्यानंतर व्यक्तीला डेंग्यू हा आजार होऊ शकतो. त्या व्यक्तीला ताप येतो आणि शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. योग्य पद्धतीने त्या पाण्याला झाकून न ठेवल्यामुळे पाण्यावर डास जमा होऊ शकतात. ते डास त्या पाण्यात अंडी घालतात. त्यातून आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे, नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.
होनगा गावातील बालिकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू असल्याची शक्यता आहे. प्रणाली परशुराम हिंदरे या 14 वर्षीय बालिकेला रविवारी दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर सोमवारी तिला ताप आला. प्रणालीच्या कुटुंबीयांनी तिला मंगळवारीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचार न झाल्याने तिचा आज मृत्यू झाला. ती होनगा येथील मराठा मंडळ विद्यालयात आठवी वर्गात शिकत होती. तिच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Belgaum student from Honga died Dengue belgavkar बेळगाव belgaum

Belgaum student from Honga died Dengue belgavkar

student from Honga died Dengue belgaum

बेळगाव : विद्यार्थिनीचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm