कर्नाटक : प्रेमप्रकरण, काळी जादू अन् तिघा भावांच्या मृत्यूनंतर पुजाऱ्याची हत्या

कर्नाटक : प्रेमप्रकरण, काळी जादू अन् तिघा भावांच्या मृत्यूनंतर पुजाऱ्याची हत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक—belgavkar : दक्षिण वैष्णोदेवी मंदिराचे पुजारी देवेंद्रप्पा महादेवप्पा वनबळ्ळी उर्फ देवप्पाज्जा (63) यांच्या हत्येमागील गूढ उकलले असून हुबळी पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला अटक केली आहे. संतोष भोजगर असे त्याचे नाव आहे. त्याने प्रेमप्रकरण आणि काळ्या जादूच्या संशयातून पुजाऱ्याची हत्याचे केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती देताना हुबळी पोलिस आयुक्त एन. शशीकुमार म्हणाले, संशियत संतोष तिप्पण्णा भोजगर (वय 44) हा कामरीपेठ हुबळी येथील रिक्षाचालक आहे.
belgaum-belgavkar-बेळगाव-belgaum-karnataka-man-arrested-for-stabbing-priest-to-death-in-hubballi-dharwad-city-202407_1.jpeg | कर्नाटक : प्रेमप्रकरण, काळी जादू अन् तिघा भावांच्या मृत्यूनंतर पुजाऱ्याची हत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर
आपल्या नातेवाईकांवर पुजाऱ्याने काळी जादू केली, असा संशय संतोषला होता. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी संतोषने पुजारी देवप्पाज्जा यांची हत्या करण्याचा कटरचला होता. देवप्पाज्जाच्या काळ्या जादूमुळे मानसिक त्रास सहन करून आपल्या कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याचे आरोपी संतोषने चौकशीदरम्यान पोलिसाना सांगितले. माहितीनुसार संतोषचे एका मुलीशी संबंध असल्याचे उघडकीस आले होते. पण, तिच्या पालकांनी पुजारी देवप्पाज्जा यांची भेट घेऊन संतोषबद्दल विचारणा केली. त्यावेळी पुजाऱ्याने संतोष हा त्यांच्या मुलीसाठी योग्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर पुजाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कुटुंबावर काळी जादू करण्यात आली आणि त्यामुळे आपल्या 3 भावांचा मृत्यू झाल्याचा संशय संतोषला होता. त्यातूनच बदला घेण्यासाठी संतोषने पुजाऱ्याचा खून केला.
दोन वर्षापूर्वर्वीदेखील त्याने पुजाऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. 2022 मध्ये हुबळी येथील विद्यानगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आणखी एका खून प्रकरणातही संतोषचा सहभाग आहे. सोशल मीडियामध्ये सीसीटीव्ही फुटेजमधील एक फोटो शेअर करण्यात आला होता. सदर फोटोतील इसमाला एका व्यक्तीने त्याला ओळखून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तो संतोषच असल्याचे निष्पन्न झाले.
संतोष हा ऑटोरिक्षा चालक म्हणून काम करतो. हुबळी-धारवाडचे कायदा व सुव्यस्था विभागाचे पोलिस उपायुक्त महानिंग नंदगावी, सी. आर. राजीव, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवप्रकाश नाईक, उमेश चिक्कमठ आणि नवनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक समीउल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तपास झाला.

Belgaum belgavkar बेळगाव belgaum Karnataka : Man arrested for stabbing priest to death in Hubballi Dharwad City

Belgaum Hubballi priest stabbed to death belgavkar

Priest murder case : Accused held in Hubballi

कर्नाटक : प्रेमप्रकरण, काळी जादू अन् तिघा भावांच्या मृत्यूनंतर पुजाऱ्याची हत्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm