Viral Video : स्टंटबाजीच्या नादात घडली जन्माची अद्दल

Viral Video : स्टंटबाजीच्या नादात घडली जन्माची अद्दल

belgavkar.com | belgaum | belgavkar

ट्रेनमधून पडल्याने तरुणाचे हात-पाय तुटले

Mumbai youth who went viral for performing stunt at railway station loses limbs

Viral Video : Man tries to repeat stunt at another railway station, loses arm & leg : स्टंटबाजीच्या नादात एका तरुणाला जन्माची चांगलीच अद्दल घडली आहे. ट्रेनमध्ये स्टंट करताना खाली पडून त्याचे हात आणि पाय तुटले आहेत. तरुणाच्या स्टंटचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फरहत आझम शेख असं या तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 14 जुलै रोजी हा तरुण शिवडी रेल्वे स्थानकात स्टंट करत होता. स्टंट करत असताना त्याने धावत्या लोकलचा दरवाजा पकडला होता आणि प्लॅटफॉर्मवर पायाने घसरत तो स्टंट करत होता. तरुणाचा हा प्रताप अनेकांनी आपल्या फोनमध्ये कैद केला होता. घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. तरुणाने केलेली स्टंटबाजी पोलिसांना समजताच त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच त्याचा शोध घेत त्याला तंबी देखील दिली. मात्र नंतर देखील या तरुणाने स्टंट करणं काही बंद केलं नाही आणि त्याची त्याला जन्मभरासाठी मोठी शिक्षा मिळाली. तरुणाने मशीद बंदर या रेल्वे स्थानकात देखील स्टंट केला. त्यावेळी तो गर्दीने भरलेल्या ट्रेनला लटकून प्रवास करत होता.
लटकून प्रवास करताना त्याचा हात निसटला आणि हा तरुण जोरात खाली पडला. खाली पडल्यावर त्याचा इतका मार लागला की, यामध्ये त्याचा एक पाय आणि एक हात तुटला. तरुणाने केलेल्या स्टंटमुळे त्याला आता जन्माची अद्दल घडली आहे. आता त्याला कायमचं अपंगत्व आलं आहे.
सोशल मीडियावर सतत असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यावर रेल्वे प्रशासनाकडून देखील वेळोवेळी अश स्टंट करणाऱ्या तरुणांना तंबी दिली जाते, गुन्हे दाखल केले जातात. मात्र तरीही सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचं भूत काही तरुणांच्या डोक्यातून उतरत नाही. आता देखील रेल्वे प्रशासनाने अशी स्टंटबाजी करताना कुणी दिसलं तर त्यांची माहिती कळवा आणि असे स्टंट करू नका अशा सूचना दिल्या आहेत.

Mumbai youth who went viral for performing stunt at railway station loses limbs

4 hours ago

Deccan

Mumbai Boy Addicted To Train Stunts Loses An Arm And A Leg

Man tries to repeat stunt at another railway station loses arm leg

8 hours ago

Times of India

Viral Video : स्टंटबाजीच्या नादात घडली जन्माची अद्दल
ट्रेनमधून पडल्याने तरुणाचे हात-पाय तुटले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm