VIDEO : @कर्नाटक खळबळजनक...! प्रेयसीला मदत केल्याने प्रियकर संतापला;

VIDEO : @कर्नाटक खळबळजनक...!
प्रेयसीला मदत केल्याने प्रियकर संतापला;

belgavkar.com | belgaum | belgavkar

चाकूने सपासप वार करत मैत्रिणीला संपवलं, घटनेचा थरारक VIDEO

Bengaluru PG murder CCTV shows man dragging woman, stabbing multiple times

Bengaluru Koramangala PG Murder Video : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. बेंगळूरमध्ये एका 24 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर येत आहे. हत्या झालेली तरुणी मुळची बिहारमधील रहिवासी होती. बेंगळूर शहरातील एका पीजीमध्ये या तरुणीची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. ही तरुणी एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे समजते. बेंगळूरू पोलिसांनी तरुणीच्या हत्येचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून सध्या या फुटेजद्वारे अधिकचा तपास करण्यात येत आहे.
क्रिती कुमारी असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. माहितीनुसार, बेंगळुरुमधील कोरमंगला या परिसरातील पीजीमध्ये राहत असलेल्या 24 वर्षीय कृतीची गळा चिरुन हत्या करण्यात आली. ती कोरमंगला येथील व्हीआर लेआउटमध्ये काम करत होती. मंगळवार 22 जुलै साधारण रात्री 11 ते 11.30 दरम्यान एका संशयित व्यक्तीने चाकू घेऊन कृती राहत असलेल्या पीजीच्या आवारात प्रवेश केला. या व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीजवळ येऊन क्रितीवर हल्ला केल्याचा पोलिसांनी संशय आहे. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासात संशयित मारेकरी हा मूळचा मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी असून आरोपीचे नाव अभिषेक असल्याचे समोर आहे.
सीसीटीव्हीमध्ये काय? : सीसीटीव्हीमध्ये तुम्ही पाहू शकता, मारेकरी हातात पिशवी घेऊन पीजीमध्ये असलेल्या खोलीच्या दिशेने जात आहे. तिथे गेल्यानंतर तो खोलीचा दरवाजा ठोठावतो काही वेळानंतर क्रितीला तो ओढून बाहेर आणतो आणि तात्काळ तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात करतो. हल्ला केल्यानंतर तो तेथून पळ काढतो. क्रितीचा आवाज ऐकून पीजी इमारतीत असलेल्या अनेक तरुणी घटनास्थळी पोहचतात.
आरोपी अभिषेक हा क्रितीचा मित्र होता, शिवाय तो क्रितीच्या एक सहकारीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आरोपी अभिषेकची मैत्रीण ही महाराष्ट्रातली होती. अभिषेक मैत्रिणीला भेटण्यासाठी वारंवार पीजीमध्ये ये-जा करत होते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि त्याच्या मैत्रिणीचे संबंध बिघडले होते. त्यामुळे त्याच्या मैत्रिणीने त्याच्या पासून लांब राहण्यास सुरुवात केली. अनेकदा अभिषेक त्या राहत असलेल्या आधीच्या पीजीमध्ये जाऊन वारंवार वाद घालत असे. त्यामुळे क्रितीने तिच्या मैत्रिणीला नवीन पीजीमध्ये शिफ्ट केले. याचा राग अभिशेषकच्या मनात होतो. त्यामुळे राग अनावर झाल्याने अभिषेकने क्रितीची निघृण हत्या केली, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.

Bengaluru PG murder CCTV shows man dragging woman stabbing multiple times

Man accused of stabbing woman to death in Bengaluru PG arrested in Madhya Pradesh

1 hour ago

The Indian Express

Bengaluru Koramangala PG Murder Video : CCTV Footage Shows Accused Brutally Stabbing Woman

VIDEO : @कर्नाटक खळबळजनक...! प्रेयसीला मदत केल्याने प्रियकर संतापला;
चाकूने सपासप वार करत मैत्रिणीला संपवलं, घटनेचा थरारक VIDEO

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm