बेळगाव : मुसळधार पावसामुळे शाळा-काॅलेज सुट्टी....

बेळगाव : मुसळधार पावसामुळे शाळा-काॅलेज सुट्टी....

belgavkar.com | belgaum | belgavkar

पावसाचा कहर...!
बेळगाव, खानापूरसह 'या' तालुक्यातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर

बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगावमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. मलप्रभा, घटप्रभा, मार्कंडेय आणि दुधगंगा नद्यांच्या वाढती पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
बेळगावात पावासाने हाहाकार केला आहे. त्यामुळे बेळगाव शहरासह, बेळगाव तालुका, निपाणी, चिकोडी, कित्तूर, बैंलहोंगल, गोकाक, मुडलगी, सौंदत्ती, रायबाग, हुक्केरी आणि खानापूर तालुक्यातील सर्व शाळांना शनिवारी (27 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रामदूर्ग तालुका वगळता सर्व तालुक्यातील शाळांना (बारावीपर्यंत) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
यामध्ये सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, माध्यमिक शाळांचा समावेश असून त्या संबंधीचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रामदूर्ग तालुका सोडून सर्व तालुक्यातील पीयु काॅलेजांनाही (बारावीपर्यंत) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क होत शाळांना सुट्टी जाहीर केली. तसंच नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता ही सुट्टी जारी करण्यात आली आहे.

Belgaum Weather updates : Schools closed in Khanapur; heavy rain warning belgavkar बेळगाव belgaum rain imd rain Gokak River

Belgaum Heavy rains force school closures in Khanapur

heavy rain school closed belgavkar belgaum

बेळगाव : मुसळधार पावसामुळे शाळा-काॅलेज सुट्टी....
पावसाचा कहर...! बेळगाव, खानापूरसह 'या' तालुक्यातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm