बेळगाव : सौंदत्ती श्री रेणुका यल्लमा मंदिर विकास प्राधिकरण

बेळगाव : सौंदत्ती श्री रेणुका यल्लमा मंदिर विकास प्राधिकरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : भूखंड घोटाळ्यावरून गदारोळ सुरू असतानाच राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लमा मंदिराच्या विकासाचा निर्णय घेतला. याबाबतच्या श्री रेणुका यल्लमा मंदिर विकास प्राधिकरण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. सौंदत्तीतील रेणुका मंदिराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत आहे. त्याकरिता धर्मादाय मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या अनुपस्थितीत कायदामंत्री एच. के. पाटील यांनी हे विधेयक मांडले.
मंदिराच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी कायदेशीर प्राधिकरणाची गरज आहे. त्याकरिता श्री रेणुका यल्लमा मंदिर विकास प्राधिकरण विधेयक अस्तित्वात आणण्यात येत आहे, त्यास मंजुरी देण्याचे आवाहन त्यांनी केले. धर्मादाय मंत्री, जिल्हा पालकमंत्री हे या प्राधिकरणाचे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील. खासदार, आमदार, बिगर सरकारी व्यक्ती, सरकारी अधिकारी या प्राधिकरणाचे सदस्य असतील.
डोंगरावर असणाऱ्या या मंदिराचा एकूण परिसर 88.37 एकर आहे. या मंदिराचा विकास पर्यटन विकास मंडळ अधिनियम आणि प्राधिकरणाच्या सहकार्यातून केला जाणार आहे. भक्तांसाठी आणखी सुविधा उपलब्ध करण्याची योजना असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

Belgaum Shree Renukaa Yallamma Devi Temple belgavkar बेळगाव Pradhikaran belgaum

Belgaum Yellamma Temple Saundatti Pradhikaran belgavkar

belgaum

बेळगाव : सौंदत्ती श्री रेणुका यल्लमा मंदिर विकास प्राधिकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm