भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

BJP leader Prabhat Jha, former Madhya Pradesh state chief

मध्य प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रभात झा यांचे निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. ते मुळचे बिहारचे आहेत. दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले भाजप नेते प्रभात झा यांनी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भाजपमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. दिल्ली, पंजाब आणि चंदीगडचे प्रभारीही होते.
प्रभात झा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी बिहारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव विशेष विमानाने बिहारमधील सीतामढी येथे नेण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ट्विटरवर एक पोस्ट करुन माहिती दिली. 'माजी प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी मिळाली. त्यांच्या शोकाकुल परिवाराला हे दुख : सहन करण्याची शक्ती देवो. मध्य प्रदेशच्या विकासातील त्यांची महत्त्वाची भूमिका आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांच्या निधनाने राजकीय जगताची कधीही भरून न येणारी हानी आहे. ओम शांती!, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Senior BJP leader Prabhat Jha passes away breathes his last in Maidanta

Senior BJP leader Prabhat Jha passes away at 67

Senior Madhya Pradesh BJP leader Prabhat Jha passed

48 minutes ago

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन
BJP leader Prabhat Jha, former Madhya Pradesh state chief

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm