अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली;

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली;

belgavkar.com | belgaum | belgavkar

वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील वाहतूक ठप्प

सरस्वती नदी दुथडी भरली

पाली (@रायगड) : अतिवृष्टीमुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली परिणामी गुरुवारी (ता. 25 जुलै) पहाटे दोन वाजल्यापासून वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलापासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. दुपारी दोन नंतर देखील ही वाहतूक ठप्प होती. तसेच अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
पाली अंबा नदी पुलाजवळ दोन्ही बाजूला जोड रस्त्यावर सखल भागात पाणी भरले होते. हे पाणी पाली मिनीडोअर स्टॅन्ड तसेच उन्हेरे फाटा इथपर्यंत आले होते. यामुळे येथील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच याच मार्गावर खोपोली बाजूकडे मोर टाक्या जवळ देखील रस्त्यावर पाणी साचल्याने तेथेही वाहतूक खोळंबली होती. दुपारी बारा नंतर पाणी ओसरल्यावर येथून वाहतूक सुरू झाली. मात्र पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पाणी असल्यामुळे ही वाहने पुन्हा त्या ठिकाणी अडकून पडली.
यावेळी खाजगी वाहने, एसटी बस, ट्रक टेम्पो आदी मालवाहू वाहने दुचाकीस्वार व प्रवासी व चाकरमानी अडकून पडले होते. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थी बाहेर पडले नाहीत. स्थानिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच आलेल्या वाहनांना मार्ग दाखवण्यासाठी मदत केली. सकाळपासूनच पालीसह इतर गावातील काही ठिकाचा विजपुरवठा खंडित झाला होता. याशिवाय सर्व ठिकाणचे मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेटचे नेटवर्क स्लो झाले होते. तर काही कंपन्याचे नेटवर्क गुल देखील झाले. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
सरस्वती नदी दुथडी भरली : सरस्वती नदी दुथडी भरली होती. त्यामुळे गोमाशी तोरंकेवाडी रस्त्यावर पाणी आल्यामुळे येथील वाहतूक देखील ठप्प होती. पाली पाटणूस मार्गाचे नुकतेच रुंदीकरण करण्यात आले आहे. तसेच नांदगाव येथे मोठा पूल बांधण्यात आला आहे. परिणामी यावेळी येथील पूलाला घासून पाणी जात होते. मात्र पुलावरून पाणी जाऊन वाहतूक ठप्प झाली नाही. तसेच भेरव येथे अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यामुळे येथील वाहतूक देखील ठप्प होती. अपेक्षा भंग वाकण पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. तसेच पाली अंबा नदीवरील एक पूल पूर्ण झाला आहे. तर दुसऱ्या पुलाचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरण व मोठ्या व रुंद पुलामुळे पावसाळ्यात हा मार्ग सोयीचा व सुखकारक होईल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र पावसाळ्यामध्ये या सगळ्याचे बिंग फुटले आहे.

Raigad Rain Amba River crossed danger level Traffic on Wakan Pali Khopoli highway blocked

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली;
वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील वाहतूक ठप्प

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm