या 22 गावांना जोडणारा पूल गेला वाहून,

या 22 गावांना जोडणारा पूल गेला वाहून,

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्र-आंध्र कर्नाटकातील 22 गावांना जोडणारा पूल

महाराष्ट्र : मागील तीन ते चार दिवसापासून लातूर जिल्ह्यात सातत्याने पावसाची हजेरी लावली आहे. संततधार पावसाने नदी नाल्यांमधून ओसंडून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे तिरु नदीला खूप पाणी आलं आणि येथील रस्ता आणि पर्यायी पूर वाहून गेला आहे. याचा थेट परिणाम 28 गावांना वर झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसाने पर्यायी पूल वाहून गेलाय. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यासह 28 गावांचा संपर्क असणारा पूल वाहून गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
bridge-washed-away-in-flood-connecting-22-villages-in-maharashtra-andhra-karnataka-atnur-village-202407_1.jpg | या 22 गावांना जोडणारा पूल गेला वाहून, | belgaum news | belgavkar बेळगावकर
पावसामुळे नदी नाल्यांना ओसंडून पाणी वाहत आहे, उदगीर तालुक्यातील अतनुर येथील पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे मुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अतनूर हे गाव महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमारेषेंना लागून आहे. या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल आणि रस्ता निर्माण करण्यात आला होता. मात्र, अतनूर,गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, जळकोट, घोणसी-अतनूर, बाराहाळी, देगलूर, मुखेड, नळगीर अश्या 28 गावांना याचा फटका बसला आहे.

Bridge washed away in flood connecting 22 villages in Maharashtra Andhra Karnataka Atnur Village

Maharashtra Andhra Karnataka

या 22 गावांना जोडणारा पूल गेला वाहून,
महाराष्ट्र-आंध्र कर्नाटकातील 22 गावांना जोडणारा पूल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm