राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले

राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले

belgavkar.com | belgaum | belgavkar

भोगावती नदीत 7212 क्युसेकने विसर्ग

Radhanagari Dam

कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेलं राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. त्यानंतर काही वेळातच 3, 4 आणि 5 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला. राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात 7212 ने विसर्ग सुरु आहे.
धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीच्या पाणीपात्रात वाढ होणार आहे. कोल्हापूर पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुट 1 इंचावर पोहोचली आहे. कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरु असली, तरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधारे बंद असल्याने अनेक गावांशी थेट संपर्क तुटला असून काही गावांना बेटाचे स्वरुप प्राप्त झालं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. धरणपाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने राधानगरी, काळम्मावाडी, वारणा धरण पाणीपातळीत वाढ होत असून धरणातून विसर्ग सुरु करण्यात आले आहेत. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

Heavy rains push Panchganga river in Kolhapur near danger mark Radhanagari Dam

1 day ago

The New Indian Express

Heavy Rains push Panchganga River close to danger mark in Kolhapur

19 hours ago

ChiniMandi

Radhanagari Dam

राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले
भोगावती नदीत 7212 क्युसेकने विसर्ग

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm