बेळगाव : सांबरा येथील रस्ता पाण्याखाली

बेळगाव : सांबरा येथील रस्ता पाण्याखाली

belgavkar.com | belgaum | belgavkar

बळ्ळारी नाल्याचे पाणी आजूबाजूच्या शिवारात

बेळगाव—belgavkar—belgaum : गेल्या आठ दिवसांपासून सुरु झालेल्या दमदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसर पुराच्या विळख्यात सापडला आहे. जवळपास शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहेत. बागलकोट रोड चौपदरी झाला. मात्र, रस्त्याच्या बाजूने गटारीचे काम न केल्याने मंगळवारी रात्रीपासून सांबरा येथील बागलकोट रस्ता पाण्याखाली गेला असून पाणी बसवन कुडची गावात पोचले आहे.
घराघरात पाणी शिरले असून केएलईचे संकल्प हॉस्पीटलही पाण्यात गेले आहे. बुधवारी या घटनेचे व्हिडिओ पाहून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने पाण्याचा निचरा करण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्यानंतर दुपारी एकनंतर दोन जेसीबी कुडचीत दाखल होत रस्त्याच्या बाजूला गटारी खोदून पाणी वाहून जाण्यास वाट मोकळी करुन दिली. बळ्ळारी नाल्याचे पाणी आजूबाजूच्या शिवारात फुगल्याने या जमिनीतील पीक यावर्षीही वाया जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी, अशी मागणी वारंवार करुनही दुर्लक्ष केल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून तसेच जनतेतून प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जोरदार पाऊस झाल्यानंतर प्रथम बळ्ळारी नाल्यालाच पूर येतो. नाल्यातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे येळ्ळूर, धामणे, वडगाव, शहापूर, जुने बेळगाव,अनगोळ, बसवन कुडची या परिसरातील शिवार पाण्याखाली जात आहे. दरवर्षी हजारो एकर जमिनीतील भात व इतर पिके वाया जात आहेत. यंदाही शिवारांमध्ये जलाशयासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्नपूर्णेश्वरीनगर, केशवनगर तसेच धामणे रोड, यरमाळ रोड, जुने बेळगाव परिसरातील अनेक घरेही या पूराच्या पाण्यात गेली आहेत.

Belgaum Road in Sambar under water belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Road in Sambar under water belgavkar

Road in Sambar under water belgaum

बेळगाव : सांबरा येथील रस्ता पाण्याखाली
बळ्ळारी नाल्याचे पाणी आजूबाजूच्या शिवारात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm