प्रतापगडाच्या पायथ्याशी खान… पुन्हा होणार शिवाजी महाराजांच्या करामतीची जाण

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान… पुन्हा होणार शिवाजी महाराजांच्या करामतीची जाण

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोथळा बाहेर काढणारा पुतळा बसवणार

सातारा (@प्रतापगड) @महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातील 'अफझलखानाचा वध' हा एक महत्वाचा भाग आहे. हा प्रसंग म्हणजे शिवरायांच्या शौर्याचं प्रतिक मानलं जातं. यावर शाहिरांनी अनेक पोवाडे देखील रचले आहेत. प्रत्येक शिवजयंतीदिनी आपल्याला अफझलखानाचा वध हा पोवाडा ऐकायला मिळतो. शिवरायांच्या याच शौर्याचं प्रतिक असलेला पुतळा महाराष्ट्र राज्य शासनानं तयार केला आहे. लवकरत तो प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवण्यात येणार आहे.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या पुतळ्याची उंची 18 फूट इतकी आहे. हा पुतळा आता पूर्णपणे तयार झाला असून त्याची झलकही एका व्हिडिओतून पहायला मिळाली आहे. येत्या महिन्याभरात सरकारकडून या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.
पुतळ्याची वैशिष्ट्ये काय? : शिवाजी महाराज अफझल खानाचा वाघनख्यांच्या सहाय्यानं कोथळा बाहेर काढतानाचं हे शिल्प आहे. यामध्ये शिवराय आणि अफझलखान अशा दोघांचे पुतळे आहेत. शिल्पकार दिपक थोपटे यांनी हे शिल्प साकारलं आहे. एकूण 18 फूट उंचीचं हे शिल्प आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ही 13 फूट तर अफझलखानाच्या पुतळ्याची उंची 15 फूट आहे. या शिल्पाचं एकत्रित वजन 7 ते 8 टन आहे. हे शिल्प साकारायला 9 महिने लागले. यासाठी 15 जणांच्या टीमनं काम केलं.
ऐतिहासिक संदर्भ काय? : (कर्नाटक) विजापूरच्या आदिलशाहचा सरदार असलेल्या अफझल खान याला प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेटीसाठी निमंत्रण दिलं होतं. यासाठी मोठा शामियाना टाकण्यात आला होता. या दोघांच्या भेटीचा दिवस हा 10 नोव्हेंबर 1659 हा होता. यावेळी अफझल खान शिवाजी महाराजांची गळा भेट घेण्यासाठी पुढे आला आणि त्यानं महाराजांची मान आपल्या काखेत दाबली आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.
पण चतुर शिवरायांनी आपल्या बोटातील वाघनख्यांचा वार करत अफझलखानाच्या कोथळा बाहेर काढला. आपल्यावर अशा प्रकारे हल्ला होऊ शकतो याची अफझल खानाला कल्पना नसल्यानं तो यामुळं गडबडला आणि जोरजोरात ओरडू लागला आणि जमिनीवर कोसळला. अशा प्रकारे शिवरायांनी अफझल खानाचा वध केल्याचं इतिहासतज्ज्ञ सांगतात. पण शिवाजी महाराजांनी आपल्यावरील हल्ला परतवून लावताना शत्रूचाच खात्मा केला यामुळं या प्रसंगाला 'शिवप्रताप' असंही संबोधलं जातं. त्यामुळं ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस महाराष्ट्रात शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.

Chhatrapati Shivaji Maharaj Afzal Khan Statue Pratapgad Fort

Afzal Khan Statue Pratapgad Fort

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान… पुन्हा होणार शिवाजी महाराजांच्या करामतीची जाण
कोथळा बाहेर काढणारा पुतळा बसवणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm