कोल्हापुराला महापुराचा धोका?

belgavkar.com | belgaum | belgavkar

‘पंचगंगे’च्या पाणी पातळीत वाढ, ड्रोनद्वारे पाहा धडकी भरवणारी दृश्य

गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळी जवळ पोहोचली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठचा सगळा परिसर जलमय झालेला आहे. पंचगंगा नदीचं पाणी कसबा बावडा ते शिये रस्त्यावर आलं असून कसबा बावडा या मार्गावर चार ते पाच फूट पाणी साचलं आहे. पुराच्या पाण्यातून वाहनधारकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे तर पाण्यातून जाताना अनेक दुचाकी पाण्यातच बंद पडल्या आहेत. तर पंचगंगा नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे कसबा बावडा ते शिये हा महत्त्वाचा मार्ग प्रभावित झालाय.
पुणे-बेंगलोर महामार्गावरील (NH4) शिवाजी पूल तसेच कोल्हापूरच्या एन्ट्री पॉईंट असलेल्या तावडे हॉटेल परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांची चिंता वाढली असून 2019 आणि 2021 च्या महापुराची आठवण यामुळे झाली आहे.

Panchaganga Water Level Rises Close to Warning Level in Kolhapur

Maharashtra flood : Drone footage of submerged Kolhapur

कोल्हापुराला महापुराचा धोका?
‘पंचगंगे’च्या पाणी पातळीत वाढ, ड्रोनद्वारे पाहा धडकी भरवणारी दृश्य

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm