देशातील 180 शहरांत उघडणार Metro मॉल

देशातील 180 शहरांत उघडणार Metro मॉल

belgavkar.com | belgaum | belgavkar

लहान दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी चांगला पर्याय

रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी उद्योगाचे साम्राज्य उभे केले आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी मक्तेदारी निर्माण केली आहे. हायड्रोकार्बन शोध आणि उत्पादन, पेट्रोलियम शुद्धीकरण आणि विपणन, पेट्रोकेमिकल्स, रिटेल आणि दूरसंचार या क्षेत्रात रिलायन्सचे वर्चस्व आहे. आता मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आपला उद्योग वाढवत आहे. तिने आपला व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स रिटेलने मेट्रो कॅश आणि कॅरी टेकओव्हर केल्यानंतर ईशा अंबानी सातत्याने व्यवसाय वाढवत आहे. एप्रिल ते जून दरम्यानच 30 नवीन स्टोअर सुरु केले आहे. मेट्रो मॉलमधून किरणा दुकानदार आणि इतर व्यावसायिकांना सामान होलसेल पद्धतीने विकले जाते.
रियायन्स रिटेलने डिसेंबर 2022 मध्ये 2,850 कोटी रुपयांमध्ये Metro Cash & Carry India विकत घेतला होता. त्यावेळी मेट्रोचे 21 शहरांमध्ये 31 मॉल होते. रिलायन्स रिटेलच्या नवीन रिपोर्टनुसार, कंपनी 180 शहरांत 200 पेक्षा जास्त Metro Cash & Carry स्टोअर्स झाले आहेत. ईशा अंबानी रिलायन्स रिटेल वेंचर्समध्ये कार्यकारी संचालक म्हणून लीड करत आहे.
मेट्रो काय आहे? : लहान दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी मेट्रो हा चांगला पर्याय आहे. या ठिकाणी B2B पद्धतीने ऑर्डर करता येते. रिलायन्सने मेट्रो विकत घेतल्यानंतर देशात 30 लाख B2B ग्राहक होते. त्यातील 10 लाख ग्राहक अ‍ॅपच्या माध्यमातून दुकानांमधून सामना मागवत होते. भारतातील रिटेल बाजारात रिलायन्सची पकड मजबूत होत आहे. तसेच या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहे. ईशा अंबानी यांचे लग्न आनंद पीरामल सोबत झाले आहे. ईशा अंबानीचे पती आनंद पिरामल यांनी भारताच्या अंडर 40 ब्राइटेस्ट यंग बिझनेस लीडर्समध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. 40 वर्षांखालील श्रेणीतील व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.

Reliance Retail opens Metro Cash Carry stores to all

Metro Cash Carry India to open smaller stores to expand quickly

Reliance opens Metros gates for all consumers

देशातील 180 शहरांत उघडणार Metro मॉल
लहान दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी चांगला पर्याय

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm