बेळगाव : फटाके तयार करताना स्फोट, युवकाचा मृत्यू

बेळगाव : फटाके तयार करताना स्फोट, युवकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : आतषबाजीसाठी शोभेचे फटाके तयार करताना स्फोट होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. गोकाक तालुक्यातील पामलदिन्नी येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. मल्लाप्पा सत्याप्पा कंकणवाडी (वय 38, रा. पामलदिन्नी) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव असून त्याच्या मृतदेहाचा अक्षरश : कोळसा झाला होता.
स्फोटामुळे पत्र्याचे शेडही पूर्णपणे उडाले आहे. घटप्रभा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपलब्ध माहितीनुसार नागपंचमीच्या वेळी पामलदिन्नी येथे आतषबाजी करण्याची परंपरा आहे. यासाठी दारुचे फटाके तयार करताना अचानक स्फोट होऊन मल्लाप्पाचा मृत्यू झाला. या घटनेत दोघे जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.
स्टोव्हच्या भडक्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. शेडला लागलेली आग विझवून जवानांनी शेडमध्ये प्रवेश केला असता मल्लाप्पाचा मृतदेह कोळसा झालेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी गर्दी जमली होती.

Belgaum Pamaldinni in Gokak Taluk Firecrackers blast Youth death belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Pamaldinni in Gokak Taluk Firecrackers blast belgavkar

Pamaldinni in Gokak Taluk Firecrackers blast belgaum

बेळगाव : फटाके तयार करताना स्फोट, युवकाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm