केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली; Landslide Hits Kedarnath Yatra Route

केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली;
Landslide Hits Kedarnath Yatra Route

belgavkar.com | belgaum | belgavkar

भाविक ढिगाऱ्याखाली गाडले, तिघांचा मृत्यू

3 dead as boulders hit Kedarnath hiking route amid heavy rain in Uttarakhand : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील भगवान शंकराचे अकरावे ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ धामकडे जाणाऱ्या पदपथावर रविवारी पहाटे दरड कोसळली. या दुर्घटनेत अनेक भाविक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे वृत्त आहे. घटना समजताच बचाव कार्य सुरू करण्यात आले. यादरम्यान 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास आपत्ती नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली. या दुर्घटनेत अनेक यात्रेकरू गाडले गेले. माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआर, वायएमएफची पथके घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकाने ढिगाऱ्यातून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. अन्य आठ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

3 dead as boulders hit Kedarnath hiking route amid heavy rain in Uttarakhand

41 minutes ago

India Today

Kedarnath Gaurikund Accident : Landslide On Pilgrimage Route;

Landslide Hits Kedarnath Yatra Route

केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली; Landslide Hits Kedarnath Yatra Route
भाविक ढिगाऱ्याखाली गाडले, तिघांचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm