बेळगाव : गणेश मंदिराजवळ अपघातात तरुण ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : हणबरवाडी (ता. निपाणी) येथील गणेश मंदिराजवळ मोटारसायकलीची घडक बसून तरुण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. अंकुश मुरारी कोळेकर (वय 31, रा. भगवा चौक, कोगनोळी) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश कोळेकर मालवाहतूक रिक्षा घेऊन हणबरवाडीकडून येत होता. येथील गणेश मंदिराजवळ आला असता वाहन नादुरुस्त झाले. काय झाले ते पाहण्यासाठी खाली उतरताना हणबरवाडीहून कागलकडे जात असलेल्या युवकांच्या मोटारसायकलची घडक बसली. यामध्ये अंकुश जागीच गतप्राण झाला. तर हणबरवाडी येथील युवक गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी युवकांना कागल येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. अंकुशच्या मागे पत्नी, आजी, चुलते असा परिवार आहे.

Belgaum Youth killed in an accident near Ganesh temple in Hanbarwadi Nipani belgavkar बेळगाव belgaum

Belgaum accident near Ganesh temple in Hanbarwadi Nipani belgavkar

accident near Ganesh temple in Hanbarwadi Nipani belgaum

बेळगाव : गणेश मंदिराजवळ अपघातात तरुण ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm