Video : झाडाच्या फांदीपेक्षाही मोठा किंग कोब्रा...! 12-foot long King Cobra rescued in Karnataka

Video : झाडाच्या फांदीपेक्षाही मोठा किंग कोब्रा...!
12-foot long King Cobra rescued in Karnataka

belgavkar.com | belgaum | belgavkar

12 फुटांचा नाग पाहून अंगावर येईल काटा;

Agumbe is also called King Cobra capital...!
King Cobra, Agumbe, Karnataka

SHOCKING video of 12-ft-long King Cobra inside residential area near Agumbe forest : भारतात सरीसर्प यांच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातही नाग म्हटले की, अनेकांना अंगावर काटा येतो. जर चुकून प्रत्यक्ष नाग दिसला तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. पावसाळ्यात साप किंवा नाग बाहेर पडल्याचे अनेकवेळा दिसते. सापाच्या बिळात पाणी शिरल्यामुळे लपून बसलेले साप बाहेर जमिनीवर किंवा झाडावर सुरक्षित जागा शोधतात. कर्नाटकच्या अगुंबे (शिवमोगा) नावाच्या गावातून अशाच एका झाडावर असलेल्या 12 फुटांच्या किंग कोब्राला वनाधिकाऱ्यांनी रेस्क्यू केले आहे. या कोब्राचे फोटो अंगावर काटा आणणारे आहेत.
अगुंबे रेनफॉरेस्ट रिसर्च स्टेशन (ARRS) या संस्थेचे संचालक अजय गिरी आणि त्यांच्या पथकाने कर्नाटकच्या अगुंबे गावातून या अजस्र अशा कोब्राला रेस्क्यू केले. हा व्हिडीओ अजय गिरी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला आहे. तसेच भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.
अगुंबे ग्रामस्थांनी अजस्र अशा किंग कोब्राला गावातील रस्ता ओलांडताना पाहिले. त्यानंतर नागाने एका घरातील आवारात असलेल्या झुडपात आश्रय घेतला. घरमालकाच्या निदर्शनास ही बाब गावकऱ्यांनी आणून देताच, त्यांनी वनविभाग आणि ARRS च्या स्वयंसेवकांना याची माहिती दिली. सदर माहिती मिळताच ARRS च्या अजय गिरींनी आपल्या सहकाऱ्यांसह पाचारण केले. नागला रेस्क्यू करण्यापूर्वी अजय गिरीच्या सहकाऱ्यांनी गावातील लोकांना काय करायला हवे आणि काय टाळायला हवे, याची इत्थंभूत माहिती दिली. जेणेकरून रेस्कूय ऑपरेशन दरम्यान काहीही गडबड होऊ नये. कारण 12 फूटांचा अजस्र नाग तावडीतून सुटल्यास मोठा गोंधळ उडू शकतो. त्यानंतर अजय गिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही मिनिटात झुडपावर आश्रय घेतलेल्या किंग कोब्राला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्याला बॅगमध्ये भरले.
अजय गिरी यांनी या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, सदर किंग कोब्राची माहिती मिळाल्यानंतर आम्ही गावात आलो. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधून रेस्क्यू करण्याची योजना आखली. सुरक्षितपणे नागाला रेस्क्यू केल्यानंतर आम्ही ग्रामस्थांमध्ये जागृतीही केली. तसेच सापांबद्दल अधिक माहिती असलेले पत्रक गावकऱ्यांना वाटले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किंग कोब्राला नैसर्गिक अधिवासात सोडले.

12 foot long King Cobra rescued in Karnataka

Giant 12 Foot King Cobra Rescued in Karnataka

King Cobra Agumbe SHOCKING video of 12 ft long King Cobra inside residential area near Agumbe forest

Video : झाडाच्या फांदीपेक्षाही मोठा किंग कोब्रा...! 12-foot long King Cobra rescued in Karnataka
12 फुटांचा नाग पाहून अंगावर येईल काटा;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm