Team India ची घोषणा; विराट-रोहित परतले;

Team India ची घोषणा;
विराट-रोहित परतले;

belgavkar.com | belgaum | belgavkar

India vs Sri Lanka : Suryakumar Yadav to lead India in T20Is | 'सूर्या' कर्णधार

IND vs SL, T20I and ODI squad announcement

India vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताच्या वन डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा कायम आहे, तर ट्वेंटी-20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्याचे डिमोशन झाल्याचे दिसते. कारण तो ट्वेंटी-20 संघाचा भाग असला तरी त्याच्यावर कर्णधार किंवा उपकर्णधारपदाची जबाबदारी नाही. टीम इंडियाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिलीच परीक्षा असणार आहे. 
भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर 3 ट्वेंटी-20 आणि 3 वन डे सामन्यांची मालिका खेळेल. ट्वेंटी-20 विश्वचषकानंतर भारताची युवा ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली होती. या मालिकेतून भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण, आता विराट, रोहित, हार्दिकसह सूर्यकुमार यांचे पुनरागमन झाले आहे. 
भारताचा वन डे संघ -  रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा. 

भारताचा ट्वेंटी-20 संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज. 
दरम्यान, 27 जुलैपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळेल. टीम इंडियाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिली परीक्षा असेल.
ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक -
पहिला सामना - 27 जुलै - संध्याकाळी 7 वा.
दुसरा सामना - 28 जुलै - संध्याकाळी 7 वा.
तिसरा सामना - 30 जुलै - संध्याकाळी 7 वा.
वन डे मालिकेचे वेळापत्रक - 
पहिला सामना - 2 ऑगस्ट - दुपारी 2.30 वा.
दुसरा सामना - 4 ऑगस्ट - दुपारी 2.30 वा.
तिसरा सामना - 7  ऑगस्ट - दुपारी 2.30 वा.

India vs Sri Lanka : Suryakumar Yadav to lead India in T20Is;

Suryakumar Yadav named India T20I captain;

Hindustan Times

IND vs SL T20I and ODI squad announcement :

Team India ची घोषणा; विराट-रोहित परतले;
India vs Sri Lanka : Suryakumar Yadav to lead India in T20Is | 'सूर्या' कर्णधार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm