Video : धोतर घातल्याने शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला, सरकारने दिला दणका @कर्नाटक

Video : धोतर घातल्याने शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला, सरकारने दिला दणका @कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

Karnataka govt to shut GT Mall for 7 days after farmer denied entry due to wearing dhoti

Elderly farmer denied entry to Bengaluru mall for wearing dhoti; video sparks outrage @कर्नाटक : बेंगळुरुमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. धोतर घातल्यामुळे एका 70 वर्षीय शेतकऱ्याला एका मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. याप्रकरणी कर्नाटकातील अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर कर्नाटक सरकारने मॉल प्रशासनला दणका दिला आहे. 7 दिवस मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्नाटकाच्या नगर विकास मंत्रालयाने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.
धोतर घातल्याने मॉलमध्ये प्रवेश नाकारला असल्याने वादाला तोंड फुटले होते. एखाद्याचा त्याच्या कपड्यावरून किंवा पंरपरेवरून भेदभाव करणे चुकीचे आहे अशी भावना लोकांमध्ये उमटली होती. शेतकऱ्यासोबत बेंगळुरुच्या जीटी मॉलमध्ये हा प्रकार घडला होता. अनेकांसाठी हा चीड आणणारा प्रकार होता. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच तापला.
16 जुलै रोजी फकिराप्पा आपल्या मुलासोबत जीटी मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा धोतर घातल्यामुळे त्यांच्यासोबत भेदभाव करण्यात आला. त्यांना कपडे बदलून येण्यास सांगण्यात आले. सुरक्षा रक्षकाने त्यांना शेवटपर्यंत आतामध्ये जाऊ दिलं नाही. फकिराप्पाच्या मुलाने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल कर्नाटक सरकार याची दखल घ्यावी लागली. वाद निर्माण झाल्यानंतर जीटी मॉल प्रशासनाकडून माफीनामा जाहीर करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकाने देखील माफी मागितली आहे. पण, व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. सामाजिक कार्यकर्त्यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता.
कर्नाटक सरकारने जीटी मॉलवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. 7 दिवस मॉल बंद ठेवावा लागेल. यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत. अनेकांनी आपल्या स्वतः चा अनुभव शेअर केला आहे. मॉल कायम स्वरूपी बंद करण्यात यावा असं देखील काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Elderly farmer denied entry to Bengaluru mall for wearing dhoti govt to shut GT Mall for 7 days

Elderly farmer wearing dhoti denied entry in Bengalurus GT mall Farmer Banned from Entering Mall in Bengaluru Elderly man denied entry to Bengaluru mall for wearing dhoti video sparks outrage

Video : धोतर घातल्याने शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला, सरकारने दिला दणका @कर्नाटक
Karnataka govt to shut GT Mall for 7 days after farmer denied entry due to wearing dhoti

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm