... म्हणून पोलिस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, Video Viral

... म्हणून पोलिस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, Video Viral

belgavkar.com | belgaum | belgavkar

police driver drives car with petrol pump staff on bonnet

Kerala police driver faces licence suspension for attempted murder of petrol pump staff in Kannur : केरळच्या कन्नूर जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पेट्रोलचे पैसे मागितल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने कार पंप कर्मचाऱ्याच्या अंगावर चढवली. त्यानंतर तो बोनेटवर पडला आणि रहदारीच्या महामार्गावर 1 किलोमीटर कार चालवत राहिला. पोलिस कर्मचाऱ्याला पैसे मागण्यासाठी जेव्हा पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने गाडी पळवली, त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.
पोलिसांनी के संतोषला अटक केली आहे आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी या पोलिसाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी पोलीस चालकाने पेट्रोलचे पैसे न भरता निघून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा कर्मचारी अनिल याच्यावर हल्ला करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. भरधाव वेगात असलेल्या कारच्या बोनेटवर एक व्यक्तीला लटकत असल्याचा सीसीटीव्ही व्हिज्युअल व्हायरल झाला आहे. जवळपास एक किलोमीटरपर्यंत रहादारीच्या रस्त्यावरून व्यक्तीला कारच्या बोनेटवर लटकन नेले होते.
एक्सवर @HateDetectors नावाच्या पेजवर Video पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये अनिल आरोपीसह वाद घालताना दिसत आहे ज्याचे नाव संतोष कुमार आहे. दोघांमध्ये वाद वाढत असताना पेट्रोलचे पैसे मागण्यासाठी अनिल कार समोर येऊन उभा राहतो. दरम्यान कारचालक अचानक गाडीचा वेग वाढवतो, त्यामुळे पट्रोल पंपाचा कर्मचारी गाडीच्या बोनेटवर फेकला गेला. बोनटवर असलेल्या कर्मचाऱ्यांसह कार भरधाव वेगाने धावत सुटते. वाहनांची ये-जा सुरु असलेल्या या रस्त्यावर जवळपास एक किलोमीटर अंतर कापल्यानंतर ही गाडी थांबली. दरम्यान हाताला दुखापत झालेल्या अनिलने नंतर शहर पोलिसात तक्रार दाखल केली.

Kerala police driver drives car with petrol pump staff on bonnet

Kerala Police Driver Drives Car with Petrol Pump Staff on Bonnet

Kerala police driver attempted murder of petrol pump staff in Kannur

... म्हणून पोलिस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, Video Viral
police driver drives car with petrol pump staff on bonnet

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm