CCTV VIDEO व्हायरल : मस्करी बेतली जीवावर...!

CCTV VIDEO व्हायरल : मस्करी बेतली जीवावर...!

belgavkar.com | belgaum | belgavkar

महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू;

Caught on camera : Woman accidentally falls to death from third floor of building in Mumbai | WATCH

Video : मित्रांमध्ये थट्टा-मस्करी ही रोजची असते. मित्रांमध्ये हसणे आणि विनोद करणे हे चालूच असते. पण, अनेकदा मस्करी करताना मस्करीची कुस्करी होते आणि होत्याचं नव्हतं होऊन बसतं. अशाचप्रकारे मित्राबरोबर मस्करी करणे एका महिलेला महागात पडले, ज्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. मित्रांबरोबर मस्करी करत असताना तिसऱ्या मजल्यावरून ती खाली पडली अन् तिचा मृत्यू झाला. डोंबिवलीमध्ये मंगळवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. मृत महिला पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह रहात होती. याप्रकरणी (डोंबिवली @मुंबई) मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
डोंबिवली पूर्व, कल्याण-शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करते. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास नगीनादेवी तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याचदरम्यान तिच्या सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि तोल गेल्याने क्षणार्धात नगीनादेवी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली.
नगीनादेवी मंजिराम असे या मृत महिलेचे नाव असून ती डोंबिवलीत ग्लोब स्टेट नावाच्या इमारतीत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती. याचवेळी बंटी नावाचा एक तरुण महिलेबरोबर मस्करी करत होता. पण, चेष्टा-मस्करी करत असताना महिलेसह त्या तरुणाचाही तोल गेला. यावेळी महिला थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली, पण तरुणाला तिथे असलेल्या लोकांनी कसेबसे वाचवले. या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
या घटनेच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, इमारतीमध्ये साफसफाई करणारे दोन ते तीन कर्मचारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चेष्टा-मस्करी करत होते. यावेळी मस्करीत बंटी टाक नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने आपल्याबरोबर काम करणाऱ्या नगीना देवी हिला हात लावला, नगीना देवी यावेळी एका कठड्यावर बसणारच होत्या, पण त्या कर्मचाऱ्याचा जोरात हात लागल्याने त्यांचा तोल गेला आणि त्या जोरात खाली कोसळल्या, बंटी टाक याचाही यावेळी तोल गेला, पण तो थोडक्यात बचावला. परंतु, नगीना देवी ही तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बंटी टाक विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास मानपाडा पोलिस करत आहेत.

Caught on camera : Woman accidentally falls to death from third floor of building in Mumbai | WATCH

Mumbai shocker : Woman dies after falling from third floor while joking around with friends

Mumbai woman falls from third floor building after prank goes wrong

CCTV VIDEO व्हायरल : मस्करी बेतली जीवावर...!
महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm