तुम्ही जी औषधं डोळे झाकून खाता, ती औषधं जीवघेणी ठरू शकतात. Drugs Controller General of India (DCGI) ने औषधांच्या तपासणीमध्ये 50 औषधं निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हटलं आहे. या सगळ्या मेडिसिन्स देशातल्या अनेक ठिकाणांवर विक्री होत आहेत आणि लोक हेच निकृष्ट ओषधं सर्रासपणे घेत आहेत. तपासणीमध्ये निकृष्ट दर्जाची जी औषधं सापडली आहेत, त्यामध्ये पॅरासिटॅमॉल 500, बीपीचं टेल्मीसारटन, कफटीन कफ सीरप, क्लोनाजेपेम, डिक्लोफेनेक, मल्टिविटॅमिन आणि कॅल्शियमच्या गोळ्यांच्या समावेश आहे.
निकृष्ट दर्जाची अशी 50 औषधं आहेत, ज्यांचा वापर देशातले लाखो लोक करतात. अनेक लोक ताप आल्यानंतर स्वतःच पॅरासिटॅमॉल खातात. या गोळ्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत, असं DCGI ने म्हटलं आहे (Paracetamol 500 mg, Telmisartan anti-hypertension drug, Cuftin cough syrup, Clonazepam tablets used to manage seizures, anti-pain relief drug Diclofenac, multi-vitamins and calcium tabs.). वृत्तानुसार, DCGI ने आपल्या रिसर्चमध्ये केसांना लावण्यात येणारी हीना मेहंदी घातक असल्याचं म्हटलं आहे. कॉस्मेटिक कॅटॅगिरीमध्ये समावेश असलेल्या हीना मेहंदीची गुणवत्ता ढासळलेली असल्याचं तपासामध्ये पुढे आलेलं आहे.
भारतातल्या कफ सीरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना परदेशात घडलेल्या आहेत. Central Drugs Standard Control Organisation(CDSCO) च्या अहवालानुसार या औषधांचे सॅम्पल घेण्यात आलेले होते. गुजरातमधलं वाघोडिया, हिमाचल प्रदेशातले सोलन, राजस्थानमधलं जयपूर, उत्तराखंड येथील हरिद्वार, हरियाणातलं अंबाला, आंध्र प्रदेशातलं हैदराबाद या ठिकाणांसह देशातल्या अनेक भागांमधून सॅम्पल घेण्यात आलेलं होतं.
'या' औषधांचाही समावेश : कॉन्सिटपेशनसाठी वापरण्यात येणारं लेक्टोलूज सॉल्यूशन, ब्लड प्रेशरसाठी घेण्यात येणारं टेलमिसाटन आणि अम्लोडिपाईन, ऑटो इम्यून डिसीससाठी डेक्सामेथासोन, सोडियम फॉस्फेट, गंभीर इन्फेक्शनसाठी वापरण्यात येणारं क्लोनाजेपाम टॅब्लेट, यांचा समावेश आहे.