बेळगाव शहरात बस कोणत्या स्थानकावर आहे.? स्मार्ट बसथांब्यावरील स्क्रिनवर बसेसची सर्व माहिती

बेळगाव शहरात बस कोणत्या स्थानकावर आहे.?
स्मार्ट बसथांब्यावरील स्क्रिनवर बसेसची सर्व माहिती

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शहरातील स्मार्ट बसथांब्यावरील प्रवाशांना बसची सहज माहिती समजणार आहे. स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांनी स्मार्ट बसथांब्यांची पाहणी केली. तसेच गुरुवारपासून (1 ऑक्टोबर) स्मार्ट बसथांब्यांवर असलेल्या स्क्रिनवर बसेसची सर्व माहिती झळकणार असल्याची माहिती दिली. स्मार्ट सिटी योजनेत परिवहन सेवेचाही समावेश आहे. त्यानुसार शहर सेवा सुधारण्यासाठी 34 कोटी रुपये खर्चुन सीबीटीचे काम हाती घेतले आहे. तर शहरातील प्रमुख बसथांब्यांवर स्मार्ट सिटीतून नवा थांबेही निर्माण केले आहेत. या थांब्यांवर स्क्रिन उभारली असून गुरुवारपासून त्यावर सीबीटीहून सुटणाऱ्या थांब्याच्या मार्गावरील शहर बसेसची माहिती वेळोवेळी अपडेट होणार आहे. परिवहन मंडळाची शहर बस कोणत्या स्थानकावर आहे ? ती किती मिनिटांत तुम्ही थांबलेल्या बस थांब्यांवर पोचणार, याची माहिती शहरातील सर्व स्मार्ट बसथांब्यावरील स्क्रिनवर दिसणार आहे.
शहरातील सर्व स्मार्ट बसथांब्यावर स्क्रिन बसविण्यात आले आहेत. जीपीएस प्रणालीनुसार बसचे नेमके ठिकाण ट्रॅक होणार असून बस किती वेळेत थांब्यावर पोचेल याची माहिती मिळणार आहे. ही माहिती स्मार्ट थांब्यावरील स्क्रिनवर प्रवाशांना दिसेल. गुरुवारपासून याचा कार्यारंभ होईल. -शशीधर कुरेर, व्यवस्थापकीय संचालक, स्मार्ट सिटी
यासाठी शहर बसेसमध्ये यापूर्वीच जीपीएस बसविले आहे. ज्याद्वारे बस कोठे थांबली आहे, तसेच ती पुढील स्थानकावर किती वेळेत पोहोचेल, याची इत्यंभूत माहिती थांब्यावरील स्क्रिनवर झळकेल. त्यामुळे प्रवाशांना बसची सविस्तर माहिती मिळत राहणार असून प्रवाशांच्या वेळेचीही याद्वारे बचत होणार आहे. स्मार्ट बसथांब्यावरील स्क्रिनचे नियंत्रण स्मार्ट सिटीच्या कमांड आणि कंट्रोल सेंटरकडे असणार आहे.
बसमध्ये असलेल्या जीपीएसवरुन बस कोठे आहे, याची माहिती कमांड आणि कंट्रोल रुमला वेळोवेळी देत राहील. तर सर्व स्मार्ट बसथांब्यांवर स्क्रिन बसविलेल्या स्क्रिनवर नंतर ही माहिती अपलोड होत राहणार आहे. बसचा रुटमॅपही या स्क्रिनवर झळकणार असल्याने बस सध्या कुठे आहे आणि ती कधी स्थानकावर पोचेल, याची माहिती बसथांब्यावरील प्रवाशांना समजणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात बस कोणत्या स्थानकावर आहे.? स्मार्ट बसथांब्यावरील स्क्रिनवर बसेसची सर्व माहिती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm