बेळगाव : महापौर आणि उपमहापौरांचा कक्ष 'लाॅक'

बेळगाव : महापौर आणि उपमहापौरांचा कक्ष 'लाॅक'

belgavkar.com | belgaum | belgavkar

तर महापालिकेसमोर आंदोलन

बेळगाव—belgavkar : आचारसंहितेच्या नावावर गेल्या दीड महिन्यांपासून महापौर आणि उपमहापौरांचा कक्ष बंद करण्यात आला आहे. राज्यात मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे कक्ष सुरु असताना महापौर, उपमहापौरांवरच अन्याय का, असा सवाल करत अधिकाऱ्यांनी कक्ष उघडले नाहीत तर महापालिकेसमोर आंदोलन करुन अधिकाऱ्यांच्या कक्षांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा आमदार अभय पाटील यांनी दिला.
ते म्हणाले, सरकार आणि अधिकाऱ्यांकडून महापौर, उपमहापौरांवर अन्याय करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे कक्ष सुरु आहेत. ते आपल्या कक्षातून काम करत आहेत. त्यांना आचारसंहिता लागू नाही. पण महापौर आणि उपमहापौरांनाच आचारसंहिता लागू आहे का? आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार पहायला मिळाला आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ महापौर आणि उपमहापौरांचे कक्ष उघडावेत, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, अधिकाऱ्यांच्या कक्षांना टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.

Belgaum Chamber of Mayor and Deputy Mayor locked belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Chamber of Mayor and Deputy Mayor locked

Chamber of Mayor and Deputy Mayor locked belgavkar

Chamber of Mayor and Deputy Mayor locked belgaum

बेळगाव : महापौर आणि उपमहापौरांचा कक्ष 'लाॅक'
तर महापालिकेसमोर आंदोलन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm