Viral Video : मेट्रोमध्ये अश्लील चाळे

Viral Video : मेट्रोमध्ये अश्लील चाळे

belgavkar.com | belgaum | belgavkar

पोलिसांनी घेतली दखल;
म्हणाले… @कर्नाटक

कर्नाटक : मेट्रोमधील अश्लील कृत्यांचे व्हिडिओ हे सातत्याने समोर येत असतात, अशाच एक व्हिडीओ बंगळुरूमधून समोर आला आहे. या व्हिडीओत तरुण-तरुणी मेट्रोमध्ये अश्लील चाळे करताना दिसून येत आहेत. या मेट्रोतील अन्य एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईमध्ये कैद असून या तरुण-तरुणी विरोधात कारवाई करण्याची मागणी बंगळुरू मेट्रो प्रशासनाकडे केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
Couple found kissing each other inside Bengaluru metro, police responds. Video
या घटनेचा व्हिडीओ प्रवाशाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तरुण-तरुणी एकमेकांचे चुंबन घेताना दिसून येत आहेत. या पोस्टमध्ये प्रवाशाने लिहीले की, आपल्या मेट्रोमध्ये नेमकं काय चाललंय? हळूहळू बंगळुरू मेट्रो दिल्ली मेट्रोमध्ये परावर्तीत होत आहे. या तरुणांवर कारवाई व्हायला हवी. तसेच या प्रवाशाने बंगळुरु पोलिसांनाही या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनीही तत्काळ या व्हिडीओची दखल घेतली असून ज्या प्रवाशाने हा व्हिडीओ पोस्ट केला, त्याच्याशी संपर्क केला असल्याचे बंगळूरू पोलिसांनी सांगितले आहे. तसेच याप्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे, असेही ते म्हणाले.
मात्र, ही घटना नेमकी कधीची आहे, याची पुष्टी होऊ शकलेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्लीत मेट्रो अशाच प्रकारची घटना घडली होती. या घटनेचाही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत काही तरुणी आपल्या चेहऱ्याने दुसऱ्या तरुणीच्या चेहऱ्याला रंग लावताना दिसून येत होत्या. या व्हिडीओवरही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.

Video Shows Couple Getting Intimate Inside Bengaluru Metro

Couple found kissing each other inside Bengaluru metro

Viral Video : मेट्रोमध्ये अश्लील चाळे
पोलिसांनी घेतली दखल; म्हणाले… @कर्नाटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm