ICC Champions Trophy 2025 : भारत पाकिस्तानात जाणार?

ICC Champions Trophy 2025 : भारत पाकिस्तानात जाणार?

belgavkar.com | belgaum | belgavkar

चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार;
बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

ICC Champions Trophy 2025 BCCI : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही पाकिस्तानमध्ये होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. आयसीसीचे पिच क्युरेटर आणि सुरक्षा टीम पाकिस्तानात पोहचली आहे. यानंतर भारतीय संघ पाकिस्तानात होणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयची भुमिका स्पष्ट केली.
Champions Trophy 2025 : BCCI says Indian team to tour Pakistan if Modi govt permits
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज दिल्लीत बोलताना सांगितले की, जर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये होणार असेल तर जे भारत सरकार सांगेल ते आम्ही करणार आहोत. जर सरकारने परवानगी दिली तर आम्ही आमचा संघ पाकिस्तानला पाठवणार. त्यामुळं आम्ही भारत सरकार जे काही सांगेल त्या प्रमाणेच करणार आहोत.

ICC Champions Trophy Indian team to tour Pakistan if Modi govt permits

India may not even travel to Pakistan for Champions Trophy

ICC Champions Trophy 2025 : भारत पाकिस्तानात जाणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार; बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm