Loksabha Election 2024 : कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यावर सावली;

Loksabha Election 2024 : कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यावर सावली;

belgavkar.com | belgaum | belgavkar

भाजपला किंमत चुकवावी लागणार..?
Karnataka Sex Scandal Case

उत्तरेतील राज्यांप्रमाणेच भारतीय जनता पक्षामागे खंबीरपणे उभे राहणारे राज्य म्हणून आजवरची कर्नाटकाची ओळख आहे. परंतु यावेळच्या निवडणुकीचे चित्र वेगळे असण्याची शक्यता आहे. भाजपला या राज्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पहिला टप्पा संपता-संपता प्रज्वल रेवण्णा प्रकरण समोर आल्यामुळे दुसऱ्या टप्प्यावर त्याच प्रकरणाची सावली असून, त्याची भाजपला मोठी किंमत चुकवावी लागेल,अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.
कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा असून गतवेळी त्यापैकी 26 जागा भाजपने जिंकल्या होत्या. इथले मतदान दोन टप्प्यांत होत असून पहिला टप्पा 26 एप्रिलला पार पडला, त्यात दक्षिण कर्नाटकातील 14 जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 14 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. भाजपने या राज्यात देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाशी (जेडीयू) आघाडी केली असून भाजप 25 आणि जेडीयू 3 जागा लढवत आहे. पैकी ‘जेडीयू’ लढवत असलेल्या तिन्ही जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले आहे, ही जेडीयूसाठी जमेची बाजू असली तरी प्रज्वल रेवण्णा प्रकरणापासून भाजपला मात्र सुटका करून घेता येत नसल्याचे चित्र दिसते.
प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू. 2019 मध्ये दोन विरोधी उमेदवार निवडून आले होते, त्यात जेडीयूचे रेवण्णा आणि काँग्रेसचे डी. के. सुरेश यांचा समावेश होता. यावेळी रेवण्णा हासन मतदारसंघातून उभे होते आणि त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभा घेतली होती.
पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या तोंडावर प्रज्वल रेवण्णाशी संबंधित लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह चर्चेत आला आणि कर्नाटकाची सगळी निवडणूकच त्या मुद्याभोवती फिरू लागली. पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्यामुळे काँग्रेसकडून थेट मोदींनाच लक्ष्य करण्यात येत आहे. हे प्रकरण रेवण्णा व जेडीयूशी संबंधित असल्याचे सांगून भाजपकडून सारवासारव केली जात होती. परंतु रेवण्णा परदेशात पळून गेल्याने, केंद्राच्या सहकार्याशिवाय हे घडू शकत नसल्याचा आरोप होत आहे.

Hassan sex scandal Prajwal Revanna alleged sexual assault clips

Karnataka Sex Scandal HD Revanna Prajwal Surrender

Obscene video case Prajwal Revanna

Loksabha Election 2024 : कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यावर सावली;
भाजपला किंमत चुकवावी लागणार..? Karnataka Sex Scandal Case

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm