Lok Sabha Election : राहुल गांधी अन् सिध्दरामैय्या यांच्या व्हिडिओवरुन वाद @कर्नाटक

Lok Sabha Election : राहुल गांधी अन् सिध्दरामैय्या यांच्या व्हिडिओवरुन वाद @कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

BJP ad targets Muslims again,

Karnataka BJP posts video targeting Muslims

Congress goes to poll panel against BJP for video 'inciting communal hatred'
Karnataka @कर्नाटक : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (ता. 7) होणार आहे. आज या ट्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. पण अजून निवडणुकीचे 4 टप्पे असल्याने देशभरात सर्व राजकीय पक्षांकडून प्रचारात रंग भरले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करत एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. भाजपने शेअर केलेल्या एका व्हिडिओवरून आता वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
कर्नाटक भाजपने (BJP) ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामैय्या यांचा एक अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि मुस्लिम आरक्षणाचा (Reservation) मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे दिसते. काँग्रेसने (Congress) या व्हिडिओची तक्रार निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय विजयेंद्र यांची तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेसने याबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्र दिलं आहे.
काँग्रेसने तक्रारीत म्हटले आहे की, भाजप कर्नाटकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीतील लोकांना कथितपणे घाबरवण्यात आले आहे. त्यांनी एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करू नये, असे या व्हिडिओतून सांगण्यात आल्याचे दिसते. एससी, एसटी, समाजातील लोकांविरोधात शत्रुता, घृणा अशी भावना निर्माण करण्याचा उद्देश दिसतो.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामैया आणि राहुल गांधी यांना व्हिडओमध्ये दाखवून आचारसंहितेचा भंग करण्यात आला आहे. काँग्रेस पक्ष एका विविष्ट धर्मातील लोकांची बाजू घेत असल्याचे यातून दाखवण्यात आले आहे. तसेच एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील लोकांना दाबले जात असल्याचे व्हिडिओतून दाखवण्यात आल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. भाजपने हा व्हिडिओ शनिवारी (ता. 4) सोशल मीडियात पोस्ट केला आहे. कर्नाटक काँग्रेसचे मीडिया प्रमुख रमेश बाबू यांनी याबाबत आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजप आणि अमित मालवीय यांच्याकडून अशाप्रकारचे व्हिडिओ सातत्याने पोस्ट केले जातात. त्यांना ते अपलोड करण्याची परवानगी कशी मिळाली, असा सवाल तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.

Congress goes to poll panel against BJP for video inciting communal hatred

Karnataka BJP posts video targeting Muslims

Lok Sabha Election : राहुल गांधी अन् सिध्दरामैय्या यांच्या व्हिडिओवरुन वाद @कर्नाटक
BJP ad targets Muslims again,

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm