पवित्र ग्रंथाची पानं गुरुद्वारात घुसून फाडली... तरुणाचा मृत्यू

पवित्र ग्रंथाची पानं गुरुद्वारात घुसून फाडली... तरुणाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय तरुणाची गुरुद्वारामध्ये हत्या करण्यात आली आहे. तरुणाने 'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'चे पानं फाडली होती. तरुणाने हे कृत्य का केलं हे समजू शकलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजपूरच्या बंडाला गावात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे (Youth beaten to death over alleged sacrilege at gurdwara in Punjab).
Gurdwara in Ferozepur’s Bandala village
मृत तरुणाचे नाव बख्शीश सिंग असं असून तो तल्ली गुलाम गावाचा रहिवाशी आहे. गुरुद्धारामध्ये घुसून त्याने पवित्र ग्रंथाची पानं फाडली. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी त्याला गुरुद्वारातील लोकांनी पकडलं. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोक गुरुद्वारामध्ये गोळा झाले होते. तसेच पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले होते. श्री गुरु ग्रंथ साहिब सतकार कमेटीचे अध्यक्ष लखवीर सिंग यांनी बख्शीशच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. बख्शीश पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे संतापलेल्या जमावाने त्याला मारहाण सुरु केली होती.
दूसरीकडे, बख्शीश सिंह याच्या वडिलांनी वेगळा दावा केला आहे. ते म्हणालेत की, 'माझ्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे त्याच्यावर उपचार देखील सुरु होते.' मुलाच्या मृत्यूनंतर वडील लखविंदर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. माहितीनुसार, जमावाच्या मारहाणीमध्ये बख्शीश सिंग जमिनीवर पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मृत तरुणाची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तो दोन महिन्यांपूर्वी दिल्लीला पळून गेला होता. घरच्यांनी त्याला परत आणलं होतं असं कळतंय.

Youth beaten to death over alleged sacrilege at gurdwara in Punjab

Gurdwara in Ferozepur’s Bandala village

Man tears holy book beaten to death in Punjab

पवित्र ग्रंथाची पानं गुरुद्वारात घुसून फाडली... तरुणाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm