#अयोध्या राम मंदिराच्या वेळेत बदल

#अयोध्या राम मंदिराच्या वेळेत बदल

आता भक्तांना दर्शनासाठी मिळणार अधिक वेळ

Ram Temple in Ayodhya revises 'darshan' and 'aarti' timings amid huge influx of pilgrims  

अयोध्येतील रामलल्लांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंदिरात दर्शनसाठी येणाऱ्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडून दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता भक्तांना भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. पूर्वी सकाळी 7 वाजल्यापासून दर्शन मिळत असे, परंतु आता भक्तांना जास्त वेळ दर्शन घेता येणार आहे.
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
मंदिर ट्रस्टने सांगितले की, आता मंगला आरती पहाटे 4 वाजता होईल, जी दिवसाची पहिली आरती असेल आणि त्यानंतर मंदिराचे दरवाजे काही काळासाठी बंद केले जातील. यानंतर सकाळी 6 वाजता शृंगार आरती होईल, त्यानंतर राम मंदिर सामान्य भाविकांसाठी उघडले जाईल.
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
याचबरोबर, मंदिरात दुपारी 12 वाजता राज भोगाची वेळ असणार आहे. यावेळी रामलल्लांना नैवेद्य अर्पण केला जाईल, परंतु या काळातही भक्तांना रामलल्लांचे दर्शन घेता येईल. संध्याकाळी 7 वाजता आरती होईल, यावेळी मंदिराचे दरवाजे 15 मिनिटांसाठी बंद राहतील, परंतु दर्शनाची व्यवस्था कायम राहील. यानंतर रात्री 10 वाजता शयन आरती होईल, त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातील. 
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
या नवीन बदलामुळे भक्तांना जास्त वेग रामलल्लांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, जुन्या पद्धतीनुसार, सकाळचे दर्शन सकाळी 7 वाजता सुरु होत होते आणि पूर्वी शयन आरती रात्री 9 : 30 वाजता होत होती. या नवीन बदलामुळे सकाळी 1 तास 30 मिनिटे आणि संध्याकाळी 30 मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार आहे. ज्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी खूप दिलासा मिळू शकतो.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
राम मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, भाविकांना जास्त काळ भगवान दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठी हा बदल करण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्शन घेता येईल.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

Ram Temple in Ayodhya revises darshan and aarti timings amid huge influx of pilgrims

Ram Temple in Ayodhya revises darshan and aarti timings

#अयोध्या राम मंदिराच्या वेळेत बदल
आता भक्तांना दर्शनासाठी मिळणार अधिक वेळ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm