बेळगाव—belgavkar—belgaum : वॉरंट जारी करण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या मार्केट पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा ऑन ड्युटी रस्त्यातच मृत्यू झाला आहे. बेळगाव-बागलकोट रोडवरील बाळेकुंद्रीनजीक सोमवारी रात्री ही घटना घडली. करेप्पा चंद्राप्पा व्यापरगी (वय 58, रा. पंतबाळेकुंद्री) असे त्यांचे नाव असून याप्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
करेप्पा मार्केट पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करत होते. ते ड्युटीवर असताना सोमवारी रात्री वॉरंट जारी करण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी बाळेकुंद्रीनजीक वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरून जात असताना कदाचित हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.