Video : दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक...

Video : दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक...

belgavkar.com | belgaum | belgavkar

पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. राज्यात सर्वत्र शिवजयंती अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप, त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे' असं मोदींनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

Video Narendra Modi on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

Video : दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक...
पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना अभिवादन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm