Mahakhumbh 2025 : महाकुंभात सोमवारी आणखी एक दुर्घटना घडली आहे. हेलियम वायूने भरलेला गरम हवेचा फुगा उड्डान घेताच फुटला, ज्यामुळे आत बसलेले 6 भाविक गंभीर जखमी झाले. हा अपघात सेक्टर 20 येथील आखाडा मार्गाजवळ घडला (near Akhara Marg in Sector 20 of the Mahakumbh Mela). यातील एका भाविकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्व जखमींवर एसआरएन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी वसंत पंचमीच्या स्नानादरम्यान दुपारी ही घटना घडली. सेक्टर 20 मधील आखाडा मार्गाजवळ एडवरटाइजिंग कंपनीचा हेलियम गॅस भरलेला गरम हवेचा फुगा जमिनीवरुन उडताच मोठा स्पोट झाला. या फुग्याच्या स्फोटामुळे प्रदीप (27), अमन(13), निखिल (16), मयंक(50), ललित (32) आणि शुभम (25) हे जखमी झाले आहेत. या सर्व भाविकांना गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातानंतर सर्व जखमींना रुग्णवाहिकेने महाकुंभ उपमध्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वांना वैद्यकीय महाविद्यालय संचलित स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. जखमींमध्ये प्रदीप आणि निखिल ऋषिकेश, अमन हरिद्वार, ललित मध्य प्रदेशातील खरगोन, शुभम इंदूर आणि मयंक हे प्रयागराज येथील आहेत. सुदैवाने गरम हवेचा फुगा उडण्याआधीच फुटला. हा अपघात उंचीवर झाला असता तर घटना मोठी होऊ शकली असती.