समुद्रामध्ये भीषण दुर्घटना; जहाज बुडून 61 जणांचा मृत्यू

समुद्रामध्ये भीषण दुर्घटना;
जहाज बुडून 61 जणांचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

जवारा शहरातून निघाले होते. ते समुद्रमार्गे

लीबियाच्या समुद्रामध्ये स्थलांतरितांना नेणारं एक जहाज बुडून भीषण दुर्घटना झाली आहे. या जहाजामध्ये असणाऱ्या सुमारे 61 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने (IOM) याबाबत माहिती दिली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, IOM ने या दुर्घटनेतून बचावलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या निश्चित केली आहे. हे जहाज सुमारे 86 स्थलांतरितांना घेऊन लीबियाच्या जवारा शहरातून निघाले होते. ते समुद्रमार्गे युरोपात जाण्याचा प्रयत्न करत होते. लीबियामध्ये 2011 साली नाटो समर्थित विद्रोह झाल्यानंतर प्रचंड अस्थिरता आहे. यामुळे कित्येक लोक हा देश सोडून युरोपात जाण्याचा प्रयत्न करतात. या लोकांची तस्करी करण्यासाठी सैन्यांचे काही गट कार्यरत असतात. लीबियाच्या काही किनारी भागावर याच गटांचं नियंत्रण आहे.
यापूर्वी जूनमध्ये झाली होती अशी दुर्घटना : यापूर्वी जून महिन्यात देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या जहाजातील सुमारे 79 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला होता. या जहाजातील शेकडो लोक बेपत्ता झाले होते.

As many as 61 migrants, including women and children, drowned following a 'tragic' shipwreck off Libya, the International Organization for Migration (IOM) in Libya said on social media platform X on Saturday. The organisation quoted survivors as saying the boat, carrying around 86 people, departed the Libyan city of Zwara. The central Mediterranean continues to be one of the world's most dangerous migration routes.

More than 60 migrants feared drowned off Libya

Women Children among 61 drowned after shipwreck off Libyan coast

61 migrants drown in shipwreck off Libya

61 drowned after shipwreck off Libyan coast

समुद्रामध्ये भीषण दुर्घटना; जहाज बुडून 61 जणांचा मृत्यू
जवारा शहरातून निघाले होते. ते समुद्रमार्गे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm