कोरोना इज बॅक...! सिंगापूरमध्ये पुन्हा कोव्हिडची एन्ट्री

कोरोना इज बॅक...!
सिंगापूरमध्ये पुन्हा कोव्हिडची एन्ट्री

belgavkar.com | belgaum | belgavkar

मास्कसह कडक नियम लागू

कोरोना पुन्हा पसरतोय? मास्क घालण्याचे केले आवाहन
सिंगापूरमध्ये कोव्हिड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वेगाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना मास्क परिधान करण्याचे आवाहन केले आहे. आजारी नसले तरी किंवा नाजूक प्रकृती असलेल्या लोकांना भेटताना विशेष काळजी घ्या, असेही मंत्रालयाने नागरिकांना कळविले आहे.
डिसेंबर महिन्यात 3 ते 9 तारखेदरम्यान कोव्हिड रुग्णांच्या संख्येत तब्बल 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तीन तारखेपूर्वी सिंगापूरमध्ये 32 हजार 35 रुग्णसंख्या होती. ती 9 तारखेपर्यंत 56 हजार 43 इतकी झाली. दररोज सुमारे 225 ते 350 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. यातील चार ते नऊ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश जण जेएन.1 यामुळे बाधित आहेत. हा बीए.2.86 या व्हेरिएंटचा उपवंश असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शॉपिंग- मेगा इलेक्ट्रॉनिक डे सेल 9-17 डिसेंबर-लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन आणि बरेच काही, मिळवा 75% पर्यंत सूट
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माहितीवरून बीए.2.86 किंवा जेएन.1 या विषाणूच्या संसर्गामुळे स्थिती उद्भवते का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी बरे वाटत नसेल तर लोकांनी काळजी घ्यावी, सामूहिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये, बूस्टर डोस घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. कोव्हिडचा संसर्गामुळे बुधवारी 560 जण रुग्णालयात होते. त्यामुळे डॉक्टरांनी इन्फ्लुएन्झा लस आणि कोव्हिड-19 बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांना आग्रह धरला आहे. कोव्हिड लोट असताना सिंगापूरमध्ये एका दिवसात 1726 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. नागरिकांना संसर्गापासून वाचविण्यावर डॉक्टरांनी भर दिला आहे.
सिंगापूरवासीयांना ताप अधिक तापदायक ठरत आहे. गेल्या वर्षभरात तापामुळे सहाशे जणांचा मृत्यू झाला. त्यातुलनेत कोव्हिडमध्ये बळी गेलेल्यांची संख्या कमी आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये सिंगापूरमध्ये 226 कोव्हिडबळी गेले. त्यामुळे तापावरील लसीकरणाला आरोग्य व्यवस्थेने भर दिला आहे.
- गंभीर स्थिती असेल तेव्हाच रुग्णालयात जाण्याचे आवाहन
- रुग्णालयांची ताकद बिगर गंभीर रुग्णावर खर्च होऊ नये
- घरी उपचार घेण्यासाठी अधिक भर देण्याचे आवाहन
- रुग्णसुविधा वाढविण्यावर प्रशासनाचा भर असणार
- मागणीनुसार खाटांची संख्या वाढविण्यासाठी रुग्णालये सज्ज
- प्रवास करताना मास्क परिधान करण्याबाबत जागरुकतेवर भर
As Singapore's COVID-19 cases continue to rise, the Ministry of Health (MOH) said it 'strongly encourages' people to wear a face mask in crowded places even if they are not ill, especially indoors or when visiting vulnerable people. The Ministry said on December 15 that the estimated number of COVID-19 cases from December 3 to 9 increased to 56,043, a 75% jump compared with 32,035 cases in the previous week. The average daily COVID-19 hospitalisations rose from 225 to 350. The average daily cases in the intensive care unit rose from four to nine, Channel News Asia reported. The vast majority of cases are infected by the JN.1 variant, a sublineage of BA.2.86.

COVID 19 | Singaporeans strongly encouraged to wear face mask following spike in cases

Singapore strongly encourages mask wearing in crowded places amid rise in COVID 19 cases

Singapore government implements preventive norms for travellers amid Covid scare

Return of scanners calls for masks in these Asian cities as Covid cases surge

कोरोना इज बॅक...! सिंगापूरमध्ये पुन्हा कोव्हिडची एन्ट्री
मास्कसह कडक नियम लागू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm