Video : सोनू निगमने मागितली पाकिस्तानी गायकाची माफी;

Video : सोनू निगमने मागितली पाकिस्तानी गायकाची माफी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल, म्हणाला, “दुबईतील माझे…”

सुप्रसिद्ध गायक सोनू निगमचं नाव न घेता पाकिस्तानी गायकाने गाणं चोरीचा आरोप केला होता. पाकिस्तानी गायक ओमर नदीमने केलेल्या आरोपांवर सोनूने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने उमरच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत आपली बाजू मांडली, तसेच उमरची माफीही मागितली. उमर नदीमने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता आणि कोणाचेही नाव न घेता टीका केली होती. गाण्याची चोरी करायची असेल तर किमान कलाकाराला श्रेय तरी द्यायला पाहिजे असं उमर म्हणाला होता.
सोशल मीडिया युजर्सना सोनू निगमचं नवीन गाणं ‘सून जरा’ आणि उमर नदीमच्या गाण्यात साम्य आढळलं. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. आता उमर नदीमच्या या पोस्टवर सोनू निगमने कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आधी उमर नदीमची माफी मागितली व नंतर घडलेला प्रकार सांगितला. सोनूने गायलेलं गाणं केआरकेवर चित्रीत करण्यात आलं आहे. सोनू निगम म्हणाला, “माझा या गाण्याशी काहीही संबंध नाही. मला दुबईत माझे शेजारी असलेल्या केआरके (कमाल आर खान) यांनी गाण्याची विनंती केली होती आणि त्यानंतर मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. मी सर्वांसाठी गाणं गात नाही. पण जर मी उमरचं गाणं ऐकलं असतं तर मी हे गाणं कधीच गायलं नसतं.”


सोनू निगमला उत्तर देत उमर नदीम म्हणाला, “मी तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही चोरी केली, असं मी म्हटलेलं नाही. पण या बातमीने नेहमीप्रमाणे वेगळं वळण घेतलं. मी तुमची गाणी ऐकत मोठा झालो आहे आणि तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. लव्ह यू...! या ड्रामामध्ये सामील असलेल्या ‘खऱ्या पात्रां’बद्दल बोलायचं झाल्यास ते माझ्या रडारवरही नाहीत. त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे गोल्डफिशला क्वांटम फिजिक्स शिकवण्यासारखं आहे. जे कोणत्याच कामाचं नाही, कारण ते समजूच शकणार नाही. यापुढे मी फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करेन.”
पुढे सोनू उमर नदीमला म्हणाला, “तू माझ्यापेक्षा चांगलं गायलं आहेस. मला वाईट वाटतंय की मी तुझे गाणं ऐकलं नव्हतं. मी ते आता ऐकलं, खूप छान गाणं आहे आणि तू माझ्यापेक्षा चांगलं गायलं आहेस. तुला खूप सारे आशीर्वाद. तुला खूप आदर आणि प्रेम मिळो.” यावर उमर म्हणाला, “तुमचा हा मेसेज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सध्या या जगात तुमच्यापेक्षा चांगला व बहुमुखी गायक कोणीही नाही. मी तुमचा खूप आदर करतो.”

Sonu Nigam responds to Pakistani singer Omer Nadeems plagiarism accusations

Sonu Nigam reacts to Pakistani singer Omer Nadeems plagiarism claims

Sonu Nigam apologises to Pakistani singer Omer Nadeem

How Internet Reacted to KRK and Sonu Nigam’s Song

Video : सोनू निगमने मागितली पाकिस्तानी गायकाची माफी;
सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल, म्हणाला, “दुबईतील माझे…”

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm