कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार कोसळण्याची शक्यता; आमदारांच्या गटासह एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर?

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार कोसळण्याची शक्यता;
आमदारांच्या गटासह एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर?

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक सरकार पडण्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री संतापले;
भाजप अन् जेडीएस...

कर्नाटक : जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष कुमारस्वामी यांनी एक दावा करत कर्नाटकमधलं काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचं म्हटलं होतं. भाजपच्या सत्तास्थापनेचा त्यांचा दावा मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी फेटाळून लावला आहे.
कुमारस्वामींचा दावा काय?
50 ते 60 आमदारांचा एक मोठा गट फुटून भाजपमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कोसळू शकतं. कुणामध्येत प्रमाणिकपणा उरलेली नाहीये, असा दावा कुमारस्वामींनी केला होता.
मुख्यमंत्री सिद्धरामैय्या काय म्हणाले?
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप आणि जेडीएस यांची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे. त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नसून सत्तेविना त्यांची अवस्था बिकट झाली आहे. कुमारस्वामी म्हणाले होते की, काँग्रेसमधला एका मोठा मंत्री आमदारांच्या मोठ्या गटाला सोबत घेवून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. केंद्राच्या तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी संबंधित मंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांची केंद्रातील भाजप नेतृत्वासोबत बातचित सुरु आहे.
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, निवडणुकीनंतर जेडीएसचं काहीही अस्तित्व उरलेलं नाही. अस्तित्व वाचवण्यासाठी कुमारस्वामी संघर्ष करीत आहेत. परंतु लोकसभेपूर्वीच भाजप आणि जेडीएसचं अस्तित्व उरणार नाही.

BJP and JDS struggling like fish out of water : Karnataka CM Siddaramaiah

Kumaraswamy claims Karnataka govt will fall after Lok Sabha polls

HD Kumaraswamy claims Karnataka government may fall soon

Karnataka govt will fall

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार कोसळण्याची शक्यता; आमदारांच्या गटासह एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर?
कर्नाटक सरकार पडण्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री संतापले; भाजप अन् जेडीएस...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm