फलंदाज बाद, तर क्षेत्ररक्षक जबर जखमीU19 Test between South Africa and England : क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कधी कधी होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होऊन जातं. क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू आपल्या खेळीसाठी जोर लावतो. खेळाडू आपल्या टायमिंगनुसार चेंडूवर प्रहार करतो. अचूक फटका बसला की चेंडू सीमेपार गेलाच समजा. त्यामुळे क्रिकेटमध्ये टायमिंग शॉटचं महत्त्व आहे. कधी कधी चांगलं टायमिंग करूनही खेळाडूला भारी पडतं. दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड सामन्यात असाच काहीसा प्रकार घडला.
दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडच्या अंडर 19 संघात यूथ टेस्ट खेळली जात आहे. या सामन्यात एका शॉटने दोन्ही संघांना अडचणीत टाकलं. एका फलंदाजाने जोरदार प्रहार करत स्वीप शॉट मारला. पण काही सेकंदातच बाद झाला. आऊट कसा झाला हे पाहालं तर कोणाच्या नशिबाला दोष द्यावा असं म्हणावं लागेल. हा फटका इंग्लंडचा फलंदाज आर्यन सावंत याने मारला होता (Aryan Sawant dismissed in an unusual way). इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सावंत आणि केशन फॉन्सेकासह मैदानात खेळत होता. सावंत स्ट्राईकला असातना 16 वर्षीय डावखुरा गोलंदाज जेसन रॉवल्स गोलंदाजी करत होता (South African bowler Jason - left-arm spinner Jason Rowles).
रॉवल्सने षटकाचा चौथा चेंडू टाकला आणि आर्यन सावंतने स्वीप शॉट मारला. हा शॉट जोरात मारला होता. त्यामुळे शॉर्ट लेगला फिल्डिंग करत असलेल्या जॉरिच वॅन शाल्विकला लागला (short-leg fielder Jorich Van Schalkwyk). सावंतने चेंडूवर इतक्या जोरात प्रहार केला होता की, स्वतः चा बचाव करण्यासाठी शाल्विक वाकला आणि चेंडू थेट हेल्मेटवर लागला. शॉट मारताच सावंतला मैदान सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण चेंडू हेल्मेटला लागून थेट स्टंपला लागला होात. सावंतला काहीच समजलं नाही आणि दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू जल्लोष करू लागले.
Click Here to Watch Videos or See More Photos
जल्लोष करताना खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा रंगही उडला. कारण हा चेंडू शाल्विकच्या डोक्यावर जोरात लागला होता. हा चेंडू लागताच तो मैदानातच पडला. त्यामुळे सर्व खेळाडू जल्लोष सोडून त्याच्या जवळ गेले. काही खेळाडूंनी शाल्विकला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही. त्यामुळे खेळाडू घाबरले. काही खेळाडूंनी मेडिकल टीम मैदानात येण्याचा इशारा केला. सुदैवाने शाल्विकला गंभीर जखम झाली नाही. प्रथमोपचार करण्यात आले असून तो आता बरसा आहे.
दरम्यान, या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या टीमने 299 धावा केल्या होत्या. त्याच्या उत्तरात दक्षिण अफ्रिकेने 319 धावा केल्या आणि 20 धावांची आघाडी घेतली. तर इंग्लंडने तिसऱ्या दिवशी दुसर्या डावात 8 विकेट गमवून 275 धावा केल्या असून 255 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून थॉमस रियू 71 आणि कर्णधार आर्ची वॉन ने 44 धावा केल्या.